भाजपच्या सोशल मीडिया सेलवर गुन्हा दाखल

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 



 


पुणे : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया सेलवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी तक्रार दिली होती.


 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत आहे. कोरोनासारख्या महामारीच्या संकटाला धैर्याने तोंड देत आहे. मात्र, भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सोशल मीडिया टीम वारंवार खालच्या स्तराला जाऊन टीका करीत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र भाजपा वाॅररुममधील मिडिया सेलने 'मुख्यमंत्री झाला, कोरोना आला. खराब पायगुण, पणवती' अशा आशयाचा मजकुर टाकुन उध्दव ठाकरे यांची बदनामी केली होती. त्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पुणे सायबर शाखेने भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


 


सोशल मीडियाचा गैरवापर करीत कोणत्याही पक्षाने अथवा व्यक्तीने इतरांची बदनामी करू नये. आपल्याला मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि समाज माध्यमांचा योग्य वापर करून सरकारला कोरोनाच्या लढ्यात सहकार्य करण्याची गरज असल्याचे हेमंत पाटील यांनी नमूद केले.