रिपाइं'तर्फे येत्या रविवारी (दि. २८) सकाळी ११ वाजता कर्वे पुतळा, कोथरूड येथे चिनी वस्तूंची होळी करण्यात येणार आहे.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


रिपाइं' रविवारी करणार चिनी वस्तूंची होळी


 


पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) 'रिपाइं'तर्फे येत्या रविवारी (दि. २८) सकाळी ११ वाजता कर्वे पुतळा, कोथरूड येथे चिनी वस्तूंची होळी करण्यात येणार आहे. 'रिपाइं'चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार चीनने गलवान खोऱ्यामध्ये भारतीय सैनिकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ, तसेच जगभर पसरलेल्या कोरोना महामारीला चीन जबाबदार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हे होळीचे आंदोलन केले जाणार आहे.


 


यावेळी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून हे आंदोलन होणार आहे. प्रसंगी पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष अशोक,शिरोळे, पश्चिम युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी, युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, अल्पसंख्याक आघाडीचे आयुब शेख, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, संजय सोनावणे, सचिव बाबुराव घाडगे, महिपाल वाघमारे, महिला अध्यक्ष शशिकलाताई वाघमारे आदी उपस्थित राहणार आहेत.


 


कोथरूड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी केशव पौळे, बाबासाहेब तुरूंकमारे, जितेश दामोदरे, वसंत ओव्हाळ, प्रमोद दिवाकर, वसंतराव वाघमारे, शिवाजीराव कांबळे, सुभाष पासोटे, दस्तगीर शेख, दीपक सगर, रमेश सोनवणे, सत्येश हिरवे, नवनाथ सोनवणे, अंकुश भोसले, संदीप पौळे, अर्जुन गव्हाणे, रेखाताई चव्हाण, उज्जवलाताई सर्वगोड यांनी या होळी आंदोलनाचे आयोजन केले आहे.


 


 


Popular posts
*माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस ना.डॉ.गोऱ्हे यांनी केले पुष्पहार अर्पण...*
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
कोरोना विषयी काळजी म्हणून .......दशक्रिया विधीस उपस्थित न राहणे बाबत*...
Image
माथेरानच्या डोंगरातील कड्यावरचा गणपती खुणावतोय.. निसर्गराजा गणपती नावाने फेमस गणपती बाप्पा मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना
श्री शंतनु भामरे यांची *राष्ट्रीय चेअरमन संशोधन आणि विकास सेल आणि राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी* निवड - अखिल भारतीय सुवर्ण संस्था सामाजिक विकास व संशोधन संस्था ( ABSSVSS)