शासन रायगड हॉस्पिटलला कोविड चा दर्जा देऊ शकतो...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


शासन रायगड हॉस्पिटलला कोविड चा दर्जा देऊ शकतो...


 


रायगड :- लोकवस्ती पासून बाहेर आणि सर्व सुविधांनी युक्त असे प्रशस्त रुग्णालय उपलब्ध असून प्रशासनाचा कानाडोळा


125 रुग्णपर्यंत कर्जतची मजल


कर्जत,ता.28 गणेश पवार


                                ट्रामा केअर सेंटर म्हणून विकसित करण्यात आलेले परंतु पूर्ण क्षमतेने सुरू न झालेले रायगड हॉस्पिटलचे रूपांतर कोविड रुग्णालयात करण्याचा शासनाने विचार करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.कर्जत तालुक्यातील हे प्रशस्त रुग्णालय सर्व सुविधांनी युक्त असून शासनाने या रुग्णालयाचा ताबा घेतल्यास रायगड वासीयांची मोठी सोय होणार आहे.दरम्यान,कर्जत आणि शेजारच्या खालापूर मधील कोविड रुग्ज सध्या पनवेल मध्ये जाऊन उपचार घेत असल्याने रायगड हॉस्पिटलचे रूपांतर झाल्यास मोठा दिलासा कोविड रुग्णांना होऊ शकतो.दरम्यान कर्जत मध्ये 125 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत


                                    कर्जत तालुक्यातील नाहीं नाही म्हणताना कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 125 वर गेली आहे.त्यामानाने शेजारच्या खालापूर तालुक्यात कोरोना ला रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.पण कर्जतला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दीडशे च्य आसपास आहे. त्यामुळे कोविड रुग्णांवर याच परिसरात उपचार करता यावेत यासाठी शासन दवाखाने उपलब्ध करून देत आहे. शासनाने खासगी मोठी हॉस्पिटल यांचे अद्याप कोविड रुग्णालयात रूपांतर करण्यात आले नाही.परंतु आज कोविड रुग्णालये निर्माण करण्याची गरज भासत आहे.कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे पनवेल तालुक्यातील कळंबोली येथील एमजीएम रुग्णालय आणि कोन येथील इंडिया बुल्स मध्ये उभारण्यात आलेल्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.त्यात जिल्ह्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या कोविड रुग्णालय म्हणून पनवेल उपजिल्हा रुग्णालय तयार केले होते.मात्र जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1000च्या पुढे गेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने महाड आणि माणगाव मध्ये तेथील उपजिल्हा रुग्णालय यांचे कोविड रुग्णालयात रूपांतर केले आहे आणि जिल्हा मुख्यालयी असलेले जिल्हा रुग्णालय कोविड च्या रुग्णांसाठी मदतीला आहे.


                                 पण रायगड जिल्ह्यासाठी ट्रामा केअर सेंटर म्हणून उभारण्यात आलेले कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील रायगड हॉस्पिटल जिल्ह्यातील सर्वात मोठे हॉस्पिटल आहे.त्या ठिकाणी सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध असून देखील केवळ मोठ्या प्रमाणात रुग्ण उपलब्ध नसल्याने 40 डॉक्टरांचा स्टाफ असलेले रायगड हॉस्पिटल गेली दोन वर्षे धीम्या गतीने कामकाज पाहत आहेत.त्या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात मुंबईमधील रुग्णालय प्रमाणे मशिनरी उपलब्ध असून ऑक्सिजन किट पासून व्हेंटिलेटर ची सुविधा आणि तब्बल 300 सुसज्ज बेड या रुग्णालयात त्यांच्या व्यवस्थापन यांच्याकडून उभे केले होते.स्वतंत्र इमारती आहेत,रुग्णवाहिका,आणि अन्य सर्व सुविधा तेथे उपलब्ध आहेत.अशा रायगड हॉस्पिटलमध्ये शासनाने कोरोना च्या पार्श्वभूमीवर कोरोन्टाइन रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष उभारला आहे.त्यात आरोग्य विभागाने 50 रुग्णाची व्यवस्था होईल अशी रचना केली आहे.पण दोन महिन्यातून अधिक काळात 50 रुग्ण देखील कोरोन्टाइन झाले नाहीत.


                                 मात्र त्या ठिकाणी असलेली सुविधा यांचा फायदा शासनाने आता कोरोना वर मात करण्यासाठी करून घेतला पाहिजे.कारण हे रुग्णालय मनुष्य वस्ती पासून दूर आहेत.तसेच मुख्य रस्त्याला लागून आहे,आणि सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी आवशयक असलेल्या सुविधा यांची उपलब्धता असलेले ते रुग्णालय असल्याने रायगड हॉस्पिटलला कोरोनाच्या काळात शासनाने कोविड रुग्णालयाचा दर्जा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.रायगड हॉस्पिटल हे नाव देखील जिल्ह्याचे कोविड रुग्णालयाला शोभेसे असून स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी भविष्यात कोरोना चा संसर्ग होऊ नये यासाठी रायगड हॉस्पिटलला कोविड चा दर्जा देण्याची गरज आहे.