स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनाही पीपीई किट देण्यात यावे - प्रकाश आंबेडकर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


  


पुणे,दि.१३ - कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांना दफन न करता त्यांना अग्नी द्यायचा असतो, मात्र अग्नी देणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालिकेने वाऱ्यावर सोडले असून त्यांना संरक्षण साधन (पीपीई किट) नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्यात यावे, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला केली आहे. 


 


      स्मशानभूमीत काम करणारा किंवा अग्नी देणारा कर्मचारी हा बहुतांश करून मसनजोगी समाजाचा असतो. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांना दफन न करता अग्नी देण्यासाठी मृतदेह स्मशानभूमीत आणून या कर्मचार्‍यांच्या ताब्यात दिला जातो. मात्र केंद्र सरकारच्या गाईडलाईन नुसार डॉक्टर, नर्स, टेक्निशियन यांना पीपीई किट दिले जाते. मात्र स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण (पीपीई) किट का दिले जात नाही, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. औरंगाबाद येथे स्मशानभूमीत काम करणाऱ्या मसनजोगी समाजाच्या १७ लोकांना कोरोना झाला आहे. असे अनेक उदाहरण देता येईल असे सांगत प्रकाश आंबेडकर म्हणाले, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पीपीई किट दिले जाते तर स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट का दिले जात नाही, माझी शासनाला विनंती आहे की त्यांनी स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट द्यावे, अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.


 


प्रकाश आंबेडकर 


अध्यक्ष- वंचित बहुजन आघाडी 


 


 


Popular posts
*एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, भारततर्फे एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शियसनेस -अल्टिमेट रिअ‍ॅलिटी संशोधन संस्थेचा शुभारंभ सामाजिक बांधिलकीतून होईल संशोधन*
Image
🚩 *शिवराज्याभिषेक* 🚩 *मनामनात* 🚩 *शिवराज्याभिषेक*🚩 *घराघरात*
Image
कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आढावा,
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image