एक तृतीयांशांपेक्षा जास्त इंजिनिअरिंग पदवीधरांना नोकरीची चिंता: ब्रिजलॅब्ज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


~ कॅम्पस प्लेसमेंटची सुविधा असूनही ७६% उमेदवारांना नोकरी मिळविण्यात अडचणी ~


 


मुंबई, १९ जून २०२०: साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मंदी असून बहुतांश संस्थांनी त्यांची भरती प्रक्रिया थांबवली आहे किंवा कर्मचारी कपात करत आहेत. या सध्याच्या अडचणीमुळे नव्याने इंजिनिअर झालेल्या पदवीधारकांना संधी शोधत असताना योग्य वेळेत नोकरी मिळण्याकरिता अडचणी येत असल्याचे भारतातील सर्वात मोठ्या आयपी संचलित इन्क्युबेशन लॅब ब्रिजलॅब्ज सोल्युशन एलएलपीद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. इंजिनिअरिंगच्या विविध शाखांमधील जवळपास १००० च्या आसपास (६० % मुले आणि ४०% मुली) विद्यार्थ्यांदरम्यान केल्या गेलेल्या या सर्वेक्षणातून नोकरीच्या शोधात असणा-यांच्या काही प्रमुख अडचणी समोर आल्या आहेत.


 


या सर्वेक्षणाद्वारे, आपल्या साथीच्या आजारानंतरच्या जगात इंजिनिअर्सना ‘जॉब रेडी’ बनवण्यात कौशल्यातील तफावत भरून काढण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखीत झाली. प्रतिसाद दिलेल्यांपैकी ७६% विद्यार्थ्यांनी त्यांच्या कॉलेजमध्ये सक्रिय प्लेसमेंट विभाग असल्याचे कबूल केले तर इतरांनी वेगळे मत मांडले. बहुतांश विद्यार्थ्यांनी सक्रीय प्लेसमेंट विभाग असल्याचे मान्य केले असले तरीही, एक पंचमांशांपेक्षा जास्त म्हणजे २४% विद्यार्थ्यांनी त्याद्वारे नोकरी मिळण्याकरिता ते पात्र असल्याचे सांगितले, हे महत्त्वाचे आहे. यातून असे सूचित होते की, तब्बल ७८.६४% विद्यार्थ्यांकडे सध्या कोणतीही नोकरी नाही.


 


सर्वेक्षणानुसार, ३५.४८% नोकरी शोधणारे इंजिनिअर्स वेळेवर नोकरी लागण्याबाबत चिंतेत आहेत. इप्सित पॅकेजपासून ते नोकरीच्या संधीचा स्रोत इथपर्यंत असंख्य विषयांभोवती त्यांना भीती आहे. विशेष म्हणजे प्रतिसाद दिलेल्यांपैकी २६.९६% पदवीधारकांनाच त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यांच्या बळावर इप्सित पॅकेज मिळण्याचा आत्मविश्वास आहे, हे अधोरेखित करणे गरजेचे आहे. नोकरी शोधणा-यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी अनुभवात्मक शिक्षणासह मजबूत कौशल्य महत्त्वाचे आहे, हेदेखील आकडेवारीवरून दिसून येते.


 


ब्रिजलॅब्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण महादेवन म्हणाले, “या सर्वेक्षणातून अनेक विचार करण्याजोगे मुद्दे समोर आले. पहिले म्हणजे, सर्वच इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांच्या कॉलेजमध्ये कॅम्पस प्लेसमेंटची सुविधा नाही. दुसरे म्हणजे, अशा प्रकारच्या सुविधा खात्रीशीर नाहीत. सध्याच्या आर्थिक मंदीमुळे भरती प्रक्रियेला अचानक विराम मिळाल्याने ही स्थिती आहे. अखेरचे आणि मुख्य म्हणजे, नोकरी शोधणा-यांना अपेक्षित मोबदल्यासह लवकरच नोकरी मिळेल का याचा आत्मविश्वास नाही.”


 


“सध्याची स्थिती पाहता, नोकरी शोधणा-यांसाठी एखाद्या मजबूत कौशल्य समूहांची गरज आहे. जेणेकरून त्यांना या स्पर्धात्मक बाजारपेठेत प्रवेश मिळण्याची खात्री मिळेल, तसेच त्यांच्या मेहनतीनुसार, त्यांना योग्य इच्छित पॅकेज मिळू शकेल,” असे महादेवन पुढे म्हणाले.


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन
कर्जत तालुक्यातील खांडस येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून....
भगतसिंग कोशियारी यांना राष्ट्रपतींनी*  *परत बोलवावे यासाठी ऑन लाईन पिटीशन*
Image