पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस कडून दिपक मानकर, काँग्रेस कडून अभय छाजेड - कैलास गायकवाड आणि आबा बागूल तर भाजपा कडून सदानंद शेट्टी इ. आमदार कोटऱ्याकरिंता ईच्छुक पाहूया पुण्याच्या वाटणाऱ्याला काय मिळते?????? 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 



 


पुणे : गेली कित्येक वर्ष आम्ही समाजात अखंडितपणे कार्यरत असून सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारची संधी दिली जात नाही प्रत्येक निवडणुकीत घराणेशाहीला प्राधान्य दिले जाते. घराणेशाही मोठी होत चालली आहे आणि कार्यकर्ता काटेकोरपणे काम करून सुद्धा कार्यकर्ताच राहिला आहे. असे कसे चालेल? असा सवाल काही कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.


 


सदानंद शेट्टी, दीपक मानकर,अभय छाजेड - कैलास गायकवाड - आबा बागुल आदी. यासारखे काही बडे नेते समाजात अविरतपणे काम करताना दिसतात परंतु त्यांच्या कार्याची दखल आत्तापर्यंत पक्षाने घेतली नाही ना शहराध्यक्षांनी! मग आम्ही कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. 


 


पक्ष कोणताही असो परंतु केलेल्या कामाची दखल मात्र कुणीही घ्यायला तयार नाही जोपर्यंत घराणेशाही जिवंत आहे तोपर्यंत नवीन चेहर्‍यांना संधी मिळणार नाही अशी टीका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी केली.


 


निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देणे हे पक्षाने ठरविले पाहिजे परंतु पक्ष जुन्याच लोकांना संधी देते. जे सच्चे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर मात्र अन्याय आहे होत आहे अशी टीका माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी केली.


 


समाजासाठी दिवस-रात्र काम करून सुद्धा पक्षश्रेष्ठी आम्हाला पुढे जाण्याची संधी देत नाहीत एक म्हणजे एकच व्यक्ती पुढे जात आहे आणि त्यांच्यात घरातील व्यक्तींना पुढे घेऊन जात आहेत अशा वेळी आम्ही काय करायचे असा प्रश्न माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पक्षश्रेष्ठींना विचारला आहे.


 


अभय छाजेड आणि कैलास गायकवाड यांनी पुणे प्रवाह प्रतिनिधी शी चर्चा करताना सांगितले की आमच्या भागातून अनेकांनी पक्षाला सोडून इतर मार्ग निवडला. परंतु आम्ही काल ही पक्षात सोबत होतो आणि पक्षासोबत च कायम राहणार, त्यामुळे काँग्रेस जेष्ठीनी यांचा निश्चितच विचार करावा.


 


तसेच आप आपल्या नेत्यांला या कोट्यातून आमदार की मिळावी, याकरिता कार्यकर्त्यांन मध्ये सोशल मीडियावर हॅशटॅग वार आणि चर्चा ला उधाण आलेले सध्या पाहावयास मिळत आहे.