पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या निर्णयाचे अनुकरण इतर मंडळांनीही करावे - आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


;


मानाच्या व प्रमुख गणेश मंडळांच्या निर्णयाचे स्वागत


 


पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय पुण्यातील मानाच्या पाच व तीन प्रमुख गणपती मंडळांनी घेतला आहे. हा निर्णय अत्यंत स्तुत्य व योग्य असून त्यांच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. पुण्यातील इतर मंडळांनीही या निर्णयाचे अनुकरण करावे, असे आवाहन शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले आहे. 


 


मानाच्या पाच व प्रमुख तीन गणेशोत्सव मंडळांच्या झालेल्या आॅनलाईन बैठकीतील निर्णयावर शिरोळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मानाच्या व प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी घेतलेल्या निर्णयाचे शिरोळे यांनी स्वागत करीत त्यांचे अभिनंदन केले आहे. 


 


सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर अशी पुण्याची ओळख आहे. या शहराचे ते वैशिष्ट्यही आहे. गणपती मंडळांनीही वेळोवेळी हे वैशिष्ट्य जपले आहे. येथील मंडळांनी उत्सव साजरे करताना नेहमी मूल्यही जपलेली आहेत. पुण्यात स्वाईन फ्ल्यू ची साथ आली होती, तेव्हाही गणपती मंडळांनी परिस्थितीचे भान राखून उत्सव साधेपणाने केला होता. याही वेळी मंडळांनी असाच महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन सामाजिक भान राखले आहे. साथीची सध्याची परिस्थिती पाहाता उत्सव साधेपणाने करण्याचाच निर्णय योग्य आहे, असेही त्यांनी सांगितले.


 


Popular posts
खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा*                                        - उपमुख्यमंत्री अजित पवार   * पुणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक
Image
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
शिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image