पुणे विभागात प्रशासनाकडून स्थलांतरीत मजुरांकरीता     निवारा व भोजनाची सोय  - विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


  


     पुणे दि. 6 :- सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 06 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 01 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 07 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 220 स्थलांतरित मजूर असून 209 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.


 


( टिप :- सदरची आकडेवारी दुपारी 12 वा.पर्यंतची आहे. )


 


0000