मनीटॅपने मुख्य जोखीम अधिकारीपदी सुजय दास यांची नेमणूक केली

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 



 


~ मजबूत पत जोखीम धोरणे तयार करण्याचे उद्दिष्ट ~


 


मुंबई, २३ जून २०२०: अॅप आधारीत ग्राहक क्रेडिट लाइन कंपनी मनीटॅपने श्री सुजय दास यांची मुख्य जोखीम अधिकारीपदी नेमणूक केली आहे. कर्ज आणि वित्तीय क्षेत्रातील दिग्गज असलेल्या सुजय यांना जोखीम व्यवस्थापन, विश्लेषण आणि क्रेडिट पॉलिसीमध्ये विविध भौगोलिक क्षेत्रातील विविध वित्तीय संस्थांमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. अनेक संस्थांमध्ये त्यांनी सर्वोत्कृष्ट जोखीम व्यवस्थापन संघ तयार केले आहेत.


 


कोव्हिडनंतरच्या अर्थव्यवस्थेत, मनीटॅपमध्ये नावीन्यपूर्ण क्रेडिट पॉलिसी आणि धोरणे आखण्यासाठी सुजय यांचे डेटा विज्ञान आणि सांख्यिकी मॉडेलिंगद्वारे समर्थित कौशल्य प्रमुख भूमिका बजावेल. यापूर्वी त्यांनी बजाज फिनसर्व्ह लिमिटेड येथे प्रमुख जोखीम विश्लेषक म्हणून काम पाहिले आहे.


 


मनीटॅपचे सह संस्थापक आणि मुख्य व्यवसाय अधिकारी श्री कुणाल वर्मा यांनी सांगितले की, 'आमच्या यशकथेच्या महत्त्वाच्या काळात सुजय यांना मंडळात आणल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. सुजय यांनी जोखीम व्यवस्थापन आणि विश्लेषणाचे सखोल ज्ञान त्यांनी समोर आणले. आमच्या जोखीम धोरणांमध्ये योग्य चेक आणि बॅलेन्सेस राखण्यासाठी आम्हाला त्यांचे उत्कृष्ट मार्गदर्शनाची अपेक्षा करतो. आमच्या मजबूत क्रेडिट शिस्तीची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांची मदत खूप महत्त्वाची ठरेल.'


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
कर्जत तालुक्यातील खांडस येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून....
भगतसिंग कोशियारी यांना राष्ट्रपतींनी*  *परत बोलवावे यासाठी ऑन लाईन पिटीशन*
Image