पहिल्यांदाच ‘पॅडी आर्ट’ च्या माध्यमातून साकारले मराठी चित्रपटाचे पोस्टर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


शिवप्रेमी युवा शेतकऱ्याने ‘पॅडी आर्ट’ मधून साकारले ‘सरसेनापती हंबीरराव’ चे भव्य पोस्टर


 


 


 


-


 


- गव्हाच्या शेतात 90 बाय 45 फुट आकाराची भव्य कलाकृती


 


- कोरोनाच्या नकारात्मक वातावरणात युवा शेतकऱ्याकडून अत्यंत पॉझिटीव्ह संदेश


 


- .. आणि प्रविण तरडे म्हणाले ‘तुझ्या या गव्हाच्या कापणीला मी स्वत: ईळा घेऊन येणार’


कोरोनाच फटका आज सर्वच क्षेत्राला बसला आहे. शेतकरीसुद्धा यातून सुटलेला नाही. लॉकडाऊनच्या काळात वेळेचा सदुपयोग करून काहीतरी वेगळे करुयात या विचाराने प्रेरीत झालेल्या एका युवा शेतकऱ्याने वेगळी वाट चोखाळत भारतात फारसे प्रचलित नसलेल्या ‘पॅडी आर्ट’च्या माध्यमातून आगामी प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य, ऐतिहासिक मराठी चित्रपटाचे पोस्टर गव्हाच्या शेतात साकारले आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यात पिंपळगाव या ठिकाणी 90 बाय 45 फुट एवढ्या मोठ्या आकाराची कलाकृती साकारण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श, प्रेरणा मानणारे युवा शेतकरी अभयसिंह आडसुळ यांच्या संकल्पनेतून तेथील जिल्हा परिषद शाळेत कलाशिक्षक असलेल्या कुंडलीक राक्षे, तसेच शिवप्रेमी अक्षय पोते यांनी या पोस्टरला 20 दिवसांच्या परिश्रमातून मूर्त स्वरूप दिले आहे. लॉकडाऊन, कोरोनाचा प्रादुर्भाव अशा संकटकालात एक सकारात्मक विचार करून एका युवा शेतकऱ्याने, कलाशिक्षकाने साकारलेले हे ‘पॅडी आर्ट’ सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार हे नक्की.


 


ही कलाकृती बघितल्यानंतर प्रविण तरडे यांनी आपल्या सोशल मीडिया आकाऊंटवर लिहिले आहे की, ‘’ अभयसिंह अडसूळ या शेतकरी मित्राच्या संकल्पनेतून कुंडलिक राक्षे या शेतकऱ्याने गव्हाची अशी शेती केली .. याला बहुदा ग्रास आर्ट म्हणतात .. कुंडलिक मी तुला ओळखत नाही पण माझा शब्द आहे तुला , तुझ्या या गव्हाच्या कापणीला मी स्वत: ईळा घेऊन येणार ..’’


Popular posts
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..* *शुभेच्छुक:-........ संपादक संतोष सागवेकर ,सा.पुणे प्रवाह परिवार.....
Image
राम उत्तम गालफाडे मा. पोलीस अधिकारी यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी
Image
स्व. श्रीमती पुष्पा अशोक भुजबळ यांचे अल्पशा आजाराने निधन
Image
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image