निसर्ग ने कोसळलेल्या फळबागा उभारण्यासाठी रिलायन्स फाउंडेशन कडून मार्गदर्शन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 कर्जत,ता.25 गणेश पवार


              निसर्ग चक्रीवादळ यात मोठ्या प्रमाणात फळबागा नष्ट झाल्या आहेत.25-30 वर्षापूर्वी उभारलेल्या या फळबागा कोसळल्या असल्याने त्या फळबागा कशा उभारण्याच्या या संकटात शेतकरी असून त्यांना रिलायन्स फाउंडेशन कडून शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना दिले. दरम्यान,ऑनलाइन पद्धतीने रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा, अलिबाग,मुरुड तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.


                 रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या स्वरूपात मार्गदर्शन केले जाते.त्यात 3 जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळ यामुळे आलेल्या वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.म्हसळा तालुक्यातील प्रगत शेतकरी यांनी रिलायन्स फाउंडेशला नुकसानग्रस्त फळबागा सावरण्यासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती.रिलायन्स फाउंडेशनच्या ऑनलाइन मार्गदर्शन चर्चा सत्रात निसर्ग चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या तालुक्यातील शेतकरी यांनी फळ बागा सावरण्यासाठी सहभाग घेतला.या ऑनलाइन चर्चासत्रात श्रीवर्धन आणि म्हसळा भागातील मोठ्या प्रमाणात असलेल्या आंबा बागा वादळामुळे खराब झाल्या आहे.या बागांची छाटणी तसेच तुटलेल्या फांद्या आणि उलमडून पडलेली झाडे कशा प्रकारे पुन्हा सुधारता येतील याच मार्गदर्शन कृषि विज्ञान केद्रातील फळ बाग तज्ज्ञ डॉ.राजेश मांजरेकर यांनी दिले. तसेच सध्या कृषि खात्यामार्फत सुरू असलेल्या फळबाग योजनांची माहिती म्हसळा तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब गावडे यांच्या माध्यमातून देण्यात आली. नुकसानग्रस्त भागात सुरू असलेल्या नुकसानीचे शासनाच्या वतीने करण्यात येणारे पंचनामे या विषयीचे मार्गदर्शन त्यांच्या कडून शेतकऱ्यांना मिळाले .


           या मार्गदर्शनाने सहभागी सर्व शेतकरी यांनी समाधान व्यक्त केले.हा कार्यक्रमाचे नियोजन रिलायन्स फाऊंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक तेजस डोंगरीकर आणि शैलेश भोईर यांनी केले होते.लॉक डाऊन असल्याने ऑनलाइन पद्धतीने चर्चा घडवून आणली जात असताना देखील शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन शास्त्रज्ञ आणि तज्ञ यांचे मार्गदर्शन घेत आहेत.