धामोते भाग उजळला, महेश विरलेंकडून स्ट्रीट लाईटची व्यवस्था, नागरिकांमध्ये समाधान

पुणे प्रवाह न्युज पोर्टल.. 


  


कर्जत दि. 11 गणेश पवार


 


            कर्जत तालुक्यातील नेरळ जवळील धामोते, साई मंदिर या भागातील रस्त्यांवर शिवसेनेचे जिल्हा परिषद विभाग संघटक व सामाजिक कार्यकर्ते महेश विरले यांनी स्व खर्चाने स्ट्रीट लाईटची व्यवस्था केल्यामुळे हा परिसर उजळून निघाला आहे. रस्त्यावर लाईटची व्यवस्था झाल्यामुळे कामावरून उशिरा अंधारातून वाट काढत येणाऱ्या चाकरमान्यांची यामुळे मोठी सोय झाल्याने त्यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे. 


              कर्जत तालुक्यातील नेरळ शहराला लागून असलेल्या कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील धामोते, साई मंदिर हा भाग नेरळ विकास प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभे राहत आहेत. त्यामुळे येथे येथे नागरीकरणही तितक्याच झपाट्याने होत आहे. तेव्हा या ठिकाणी राहणारे चाकरमानी हे रात्रीअपरात्री नेरळ रेल्वे स्थानकातून आपल्या कामावरून घरी परतत असतात. मात्र या भागात रस्त्यावर लाईटची नीटशी व्यवस्था नसल्याने पेशवाई रस्ता, स्वागत व्हिलेज, साई मंदिर ते धामोते या मुख्य रस्त्यावरून त्यांना अंधारातून वाट काढावी लागत होती. तेव्हा या भागात स्ट्रीट लाईटची व्यवस्था व्हावी ही प्रमुख मागणी येथील रहिवाश्यांनी होती. या मागणीचा विचार करत येथील शिवसेनेचे जिल्हा परिषद विभाग संघटक व सामाजिक कार्यकर्ते महेश विरले यांनी रोशन म्हसकर, साक्षी सोमनाथ विरले, अस्मिता पपेश विरले, नूतन भरत पेरणे यांच्या सहकार्याने व्हिलेज ते पेशवाई रस्ता असे 14, नेरळ बस स्टॉप ते धामोते असे 24 व इतर भाग असे एकूण 60 विद्युत खांब स्व खर्चाने उभे करून त्यावर एलईडी लाईटची व्यवस्था केली आहे. स्ट्रीट लाईटच्या या व्यवस्थेमुळे येथील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. 


 


 


चौकट


 


आम्ही स्वागत व्हिलेज या भागात राहतो. येथे परिसरात राहणारे अनेक लोक रात्री आपल्या कामावरून परतत असतात. मात्र रस्त्यावर लाईट नसल्याने आम्हा सर्वांना रात्री अंधारातून वाट काढावी लागत होती. तेव्हा आमच्या येथे सदैव मदतीला धावून येणाऱ्या महेश भाऊ विरले यांना आम्ही आमची समस्या सांगितली होती. त्यानुसार त्यांनी लावलेल्या स्ट्रीट लाईटमुळे आमची मोठी समस्या मार्गी लागली आहे.


: रश्मी राणे, रहिवासी


 


Popular posts
कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर 5 टक्के कॅशबॅक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहनधारकांसाठी 11 जानेवारी, 2021 पासून सवलत योजना
झीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*
BLaCK PAPPER PANT*💕💕💕
Image
मानव आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उत्तर प्रदेश हाथरस येथील "मनिषा वाल्मिकी" दलित पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंड गार्डन चाैकात कँन्डल लावून श्रद्धांजली वाहण्यात आली...
Image
राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩     !! निलेश म निम्हण मित्र परिवार !!........... दिवस_ 33...             दिनांक 1/5/2020
Image