पुणे प्रवाह न्युज पोर्टल
मात्र डिकसळ ग्रामस्थांचा विरोध
कर्जत,ता.23 गणेश पवार
कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कोरोना विषाणू यांची टेस्ट घेण्यासाठी स्वाब मशीन बसविण्यात आले आहे.ते मशीन डिकसळ येथील रायगड हॉस्पिटलला हलविण्यात यावे अशी मागणी कर्जत मधील स्वयंसेवी संस्थांनी केली आहे.दरम्यान,स्वाब मशीन डिकसळ येथील रायगड हॉस्पिटल मध्ये हलविण्यास तेथील ग्रामस्थांनी विरोध केला आहे.
कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील कोवीड थ्रोट मशीन कर्जत शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आहे.मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात स्वाब देण्यासाठी कर्जत तालुक्यातील विविध भागातून लोकांची गर्दी होत असते.त्याचा थेट परिणाम कर्जत शहरातील जनतेवर आणि बाजारपेठ वर होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे कोरोना विषाणू चा ससंर्ग वाढण्याची शक्यता असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कर्जत उपजिल्हा रुग्णालयात बसविण्यात आलेले थ्रोट मशीन तेथून हलवून कर्जत-नेरळ रस्त्यावर असलेल्या रायगड हॉस्पिटल,डिकसळ येथे हालविण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.जेणे करून पेशंट बाहेरच्या बाहेर तपासणी करून जाऊ शकतो आणि सामान्य माणूस सरकारी दवाखान्यात डिलीव्हरी, सर्प चावलेले किंवा ऐस्सीडेंट तसेच साथीचे इतर आजारावर उपचार करण्यासाठी येत असतो.कोरोना तपासणीसाठी येणारे रुग्णांच्या सानिध्यात सरकारी हॉस्पिटलचे रुग्ण येण्याची दाट शक्यता आहे. तसं काही घडल्यास हॉस्पीटल सिल होण्याची भीती आहे.अशा परिस्थितीत सर्वसामान्य रुग्णांनी जायचं कुठे? याचा विचार लॉकडाऊन,त्यामुळे निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती आणि खाजगी दवाखाने बंद असतात.त्यामुळे सर्वसामान्य, गोरगरीबांना सरकारी दवाखाना एकमेव आधार आहे.
निवेदनाची दखल घेऊन त्वरीत कोविड थ्रोट टेस्टची मशिन सरकारी हॉस्पीटल मधुन रायगड हॉस्पीटल मध्ये हलविण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.त्यांनी याबाबतचे निवेदन कर्जत चे तहसीलदार विक्रम देशमुख यांना देण्यात आले.त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी धर्मेंद्र मोरे,प्रदीप ढोले,राहुल गायकवाड,सुनिल वाघमारे तसेच आदी पदाधिकारी उपस्थित होते.मात्र कर्जत शहरातील स्वयंसेवी संघटना यांनी मागणी केल्यानंतर डिकसळ गावातील ग्रामस्थ यांनी ही माहिती मिळताच रायगड हॉस्पिटल येथे धाव घेतली आहे.ग्रामस्थांनी रायगड हॉस्पिटलमध्ये कोणत्याही स्थितीत स्वाब टेस्टिंग मशीन आणू नये यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.त्यासाठी ग्रामस्थ तेथे थांबून राहिले आहेत,त्यात सर्व ग्रामस्थांना एकत्र करण्यासाठी उत्तम गायकवाड,ज्ञानेश्वर साळोखे यांनी सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न याकामी सुरू केला आहे.
फोटो ओळ
तहसीलदार यांना निवेदन देताना
छायः गणेश पवार