कर्जत तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



शहरात एक तर ग्रामीण भागात एक,संख्या पोहचली 30वर


कर्जत,ता.6 गणेश पवार


                            कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 30 वर पोहचली असून दोन नवीन रुग्णांची भर त्यात पडली आहे.कर्जत शहर आणि ग्रामीण भागात असे प्रत्येकी एक एक रुग्ण आढळला असून ते दोन्ही रुग्ण तरुण असून आपल्या घरातून अंबरनाथ,बदलापूर असे रोज ये-जा करीत आहेत.


                           कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 30 झाली असून त्यात आज कर्जत शहरात एक आणि ग्रामीण भागात एक असे दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.कर्जत शहरातील मुद्रे भागातील नाना मास्तर नगर मध्ये राहणारे हा रुग्ण दररोज कर्जत ते अंबरनाथ असा प्रवास करीत असून तेथे एका औषध कंपनी मध्ये हा तरुण कामाला आहे.त्या 38 वर्षीय तरुणामुळे आता कर्जत शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11 वर गेली आहे.तर काही दिवस कोरोना पासून लाम्ब असलेल्या कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागात देखील पुन्हा डोके वर काढले आहे.


                                    नसरापूर ग्रामपंचायत मधील गणेगाव गावातील 40 वर्षीय तरुण बदलापूर येथे औषध निर्माण कंपनी मध्ये नोकरी करीत आहे.दररोज ये जा करणार्या या तरुणाला यापूर्वी देखील न्यूमोनिया झाला होता आणि त्यानंतर डॉक्टरांनी घरी राहून आराम करायला सांगितला होता.मात्र कडाव येथील बाजारपेठ मध्ये हा तरुण नेहमी दिसत असल्याने 6 जून रोजी त्या तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कडाव परिसरात मोठी भीतीचे वातावरण पसरले आहे.कर्जत शहरातील सुखंम हॉस्पिटलमध्ये दोन दिवसापासून उपचार घेत असलेल्या तरुणाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह निघाल्याने रुग्णालय देखील कोरोन्टाइन करावे लागणार आहे.त्याबाबत कर्जत नगरपरिषद प्रशासन आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालय हे अंतिम निर्णय घेणार आहेत.


                            दुसरीकडे या दोन तरुण यांच्या कोरोना पॉझिटिव्ह टेस्ट मुळे कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 30 वर पोहचली आहे.त्यात आज विविध कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 15 असून 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोना वर यशस्वी मात केली आहे.तर तीन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.मात्र कर्जत तालुका प्रशासनाने खबरदारी घेण्यात कोणतीही कसूर सोडली नसून तालुक्यातील पूर्वी सारखेच लॉक डाऊन चे नियम पाळले जात आहेत.