बोपोडी सिग्नल ठरतोय मृत्यूचा सापळा एकदा बळी गेल्यावर* *प्रशासन जागे होणार का???

पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 



 


*बोपोडी :-* बोपोडी सिग्नल याठिकाणी कोरोनामुळे लाॅकडाऊन असताना रस्त्यावरील कामाकरिता येथे राडारोडा टाकण्यात आला आहे. परंतू आता लाॅकडाऊन संपल्यावर, आणि जनजीवन पुरर्वपदावर येत असताना, याठिकाणी टाकण्यात आलेल्या राडारोडा मुळे येथे वाहतूक कोंडी पाहावयास मिळत आहे. तसेच सिग्नल पडल्यावर आणि सुटल्यावर गाडी पुढे काढण्याच्या नादात या पडलेल्या वाळू - रेतीवर घसलून एकदा वाहन चालकांला अपघात होऊन, सदरच्या व्यक्तीला किंवा सोबत असणाऱ्या व्यक्तींना कायमचे अपंगत्व किंवा मरण येणाची शक्यता नाकारु शकत नाही???


असे अपघाती मरण किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास याला जवाबदार कुणाला धरायचे आणि कुणावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करायचा या प्रश्नाचे उत्तर संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधीं देणार का?????