पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश: आपत्कालिन मदत यंत्रणेचे मानले आभार*..... मा. अजित पवार उपमुख्यमंत्री महा. राज्य.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


उपमुख्यमंत्री कार्यालय,


मंत्रालय, मुंबई,


दि. 4 जून 2020


 


*


*पुणे शहर व जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा* *उपमुख्यमंत्र्यांनी घेतला लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडून आढावा*


मुंबई, दि. 4 :- ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाची संवाद साधून जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. चक्रीवादळाच्या संकटकाळात मदतकार्यात सहभागी झालेले लाईफ गार्ड, पोलिस, संरक्षण दलांचे, एनडीआरएफचे जवान, स्थानिक स्वराज संस्थांचे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, आपत्कालिन यंत्रणेतील, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, नगारिकांचे उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर आभार मानले आहेत. 


पुणे शहरात तसंच मावळ, आंबेगाव, जुन्नर, खेड, वेल्हे, मुळशीसह इतर तालुक्यातही वादळानं मोठे नुकसान केले आहे. घरं, शाळा, अंगणवाड्या, गुरांचे गोठे, भाजीपाल्याची पिके, फळबागांचं झालेलं नुकसान प्रचंड आहे. पोल्ट्री शेड, कांदा चाळी, पॉली हाऊसचे पत्रे उडून गेल्याचे प्रकार घडले आहेत. वीजेच्या तारा व खांब मोडून पडल्यानं वीजयंत्रणेचंही नुकसान झालं आहे. पुणे जिल्ह्यात आणखी एक-दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधून सद्यपरिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासकीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करुन नुकसानीबद्दलची माहिती जाणून घेतली. पंचनामे पूर्ण होऊन अहवाल येताच मदतीबद्दल निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.


00000


Popular posts
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
एम. सी.ई सोसायटीच्या इंग्लीश मिडियम स्कूल आयोजित क्रीडा करंडक स्पर्धेत 'सर सय्यद अहमद हाऊस' विजयी*                                                                                    
Image
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या