*शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


  


अलंकार सांस्कृतिक भवन,शिवापूर येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन सासवडचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून राजगड पोलीस स्टेशन चे ए.पी.आय. दत्तात्रय दराडे ,पी.एस.आय समीर कदम, पी.एस.आय निखिल मगदूम हे उपस्थित होते. सदर शिबिरामध्ये शिवगंगा खोऱ्यातील सर्व शिवभक्तांनी उत्स्फूर्तपणे मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत रक्तदान केले.तसेच 63 शिवभक्तांनी रक्तदान केले.सदर शिबीराचे आयोजन हे ऍड. विठ्ठलराव कोंडे-देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. डॉ प्रशांत दुमने, रमेश बापू कोंडे, दिगंबर नाना दिघे, संजय अण्णा दिघे,राजमुद्रा मित्रमंडळ कुसगाव,परीस युथ फाउंडेशन, राजगड पोलीस स्टेशन यांचे सहकार्य लाभले. तसेच रक्तसंचयनाचे कार्य आधार ब्लड बँक यांच्याद्वारे करण्यात आले.


Popular posts
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा*                                        - उपमुख्यमंत्री अजित पवार   * पुणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक
Image