प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, शाश्वत उर्जा निर्मिती, हवामान बदल आणि रोजगार हे कोरोनानंतरचे महत्वाचे विषय असणार आहेत

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


कृपया प्रसिद्धीसाठी दि. 04 जून 2020


 


शाश्वत विकास ध्येय पूर्तीसाठी 


विद्यापीठांनी संशोधनाला प्रोत्साहन द्यावे


 


डॉ. राजेंद्र शेंडे यांचे एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या वेबिनारामध्ये प्रतिपादन


 


पुणे, ता. ०४ :- शाश्वत विकासाच्या दिशेने विचार करण्यास आणि कार्यक्रम राबविण्यास सगळ्या जगाने गेल्या काही वर्षांपासून सुरुवात केली आहे. जगावर घोंघावत असलेल्या करोनाच्या वादळामुळे तर या विषयाकडे नव्याने बघितले जाणार आहे. शाश्वत विकासाच्या धैय्य पूर्तीसाठी लागणाऱ्या नवकल्पनांची आणि संशोधनाची गरज जगाला भासणार आहे ती गरज विद्यापीठांनी पूर्ण करावी. यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करून संशोधक विद्यार्थी घडविण्याकडे विद्यापीठांनी आपले लक्ष केंद्रित करावे, असे प्रतिपादन टेरे पॉलिस सेंटरचे चेअरमन डॉ. राजेंद्र शेंडे यांनी केले. 


 


एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाद्वारे आयोजित शाश्वत विकासाचे ध्येय या विषयावरील वेबिनारमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होत. यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश. तु. कराड, प्रा. सुराज भोयर यांच्यासह देशातील दोन हजारांहून अधिक प्राध्यापक, विद्यार्थी यांनी सहभाग घेतला तसेच फेसबुकच्या माध्यमातून २० हजार नागरिकांनी वेबीनार पाहिले.   


डॉ. राजेंद्र शेंडे म्हणाले, या आधीही या जगाने कोरोनासारखी साथ पाहिल्या आहेत. पण कोरोनाची साथ वेगळी आणि अधिक विश्वव्यापी ठरली आहे. कोरोना हा नवीन व्हायरस आहे. याची अद्यापही लस मिळाली नाही. परिणामी शिक्षण क्षेत्रासह अनेक क्षेत्रात अमुलाग्र बदल होण्याची होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी नैसर्गिक संसधानाचा उपयोग करून शाश्वत विकास साध्य करण्यासाठी संशोधनाची कास धरावी. विकासापासून कोणीही वंचित रहाता कामा नये हे शाश्वत विकास ध्येयांचे मुख्य उद्दिष्ट आहे. भारतासारख्या देशातला मानवसमाज आर्थिक सुबत्ता, लिंग, वय, वर्ण आणि जात इतकेच नव्हे तर लोकांचे होणारे विस्थापन, शारीरिक विकलांगता आणि भौगिलिक अंतर अशा अनेक गोष्टींमध्ये विभागला गेलेला असल्यामुळे, अशा समाजात कोणालाही विकासापासून वंचित राहू द्यायचे नसेल तर त्यासाठी समाजातल्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. यासाठी सुयोग्य मार्ग प्रत्येक विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी शोधावे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना भविष्यात शाश्वत धोरणांच्या अंमलबजावणीसाठीही काम करावे लागेल. शहराचा आणि ग्रामीण भागाचा हवामान कृती आराखडा तयार करणे, टाकाऊ अन्नाचे प्रमाण कमी करणे, अशा प्रकल्प हाती घ्यावे लागेले. या शिवाय, संशोधन क्षेत्रातही काम करावे लागणार आहे. 


. जगापेक्षा भारतातील दरडोही उत्पन कमी आहे. यासाठी सरकारनी आपल्या धोरणांमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. भारतात आजही शहरासह ग्रामीण भागात रस्ते, पाणी आणि रोजगाराच्या समस्या आहेत. कृषी क्षेत्रातील बेरोजगारी वाढू लागली आहे. यासाठी या क्षेत्रातील धोरण बदलून गुंतवणुक वाढवावी लागणार आहे. उच्च शिक्षण संस्थाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगले आरोग्य शिक्षण देण्याची गरज आहे. मेडिकल संस्था वाढविण्याची आवश्यकता आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठाने आरोग्य शिक्षणाचा समावेश आपल्या अभ्यासक्रमात केला आहे. उच्च शिक्षणाचा शाश्वत विकास साधने आवश्यक आहे. यासाठी खासगी आणि सरकारी शिक्षण संस्थांनी पुढाकार घेऊन काम करण्याची गरज आहे. केंद्र व राज्य सरकार आणि विद्यापीठ आयोग यांच्यासोबत सामंजस्य करार करावा लागेल. सध्याला रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. त्याचा लाभ सर्वच क्षेत्रांनी करून घ्यावा. संशोधन ही विकासाची चावी असून विद्यापीठांनी आपल्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहित करावे.


 


जनसंपर्क विभाग 


एमआयटी - एडीटी विद्यापीठ