शेलू येथे उत्तर भारतीय मजुराचा क्षुल्लक कारणावरून खून;आरोपी मित्र फरारी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


 


कर्जत :-  तालुक्यातील शेलू गावातील एका बांधकाम साईट वर मजूर म्हणून काम करणाऱ्या एका उत्तर भारतीय मजुराचा रात्री खून झाला आहे.लॉक डाऊन असल्याने ते दोघे मजूर राहत असलेल्या चाळी मधून गप्पा मारण्यासाठी एका कार्यालयाच्या बाहेर रात्री बसले होते आणि त्या दोघात झालेल्या वादातून हा खून झाला आहे.दरम्यान,त्या भागात कोणी नसल्याने घटना घडली त्याची माहिती कोणालाही नसल्याने पोलीस तपासात अडचणी निर्माण होत आहेत.मध्य रेल्वेचे उपनगरीय स्थानक असलेल्या शेलू गावात मोठ्या प्रमाणात बांधकाम साईट आहेत.मात्र मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉक डाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग येथून आपल्या मूळ गावी परतले आहेत.असे असताना देखील कामे पुन्हा सुरू होतील म्हणून काही मजूर अजूनही थांबुन आहेत.उत्तर प्रदेशातील रहिवाशी असलेले त्यातील मित्र म्हणून एकत्र राहणारे दोन मजूर हे 31 मे रोजी नेहमी प्रमाणे रात्री एकत्र बसले होते.शेलू-बांधीवली रस्त्यावर असलेल्या माजी उपसरपंच गुरुनाथ मसणे यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या व्हरांड्यात ब्रिजभान यादव -44 आणि कपिल देव मुन्ना भारती उर्फ सिंघनिया हे एकत्र गप्पा मारत बसलो होते.तेथे जवळच असलेल्या चाळी मध्ये राहणारे हे दोघे मजूर यांच्यात रात्री साडे अकराच्या सुमारास वादावादी झाली आणि त्यात ब्रिजभान यादव यांचा मृत्यू झाला.कपिलदेव मुन्ना भारती उर्फ सिंघनिया याने ब्रिजभानच्या तोंडावर तसेच हनुवटी वर माती ची वीट जोरात  घातल्याने ब्रिजभान यांचा जागीच मृत्यू झाला.


 


                              सध्या लॉक डाऊन असल्याने त्या परिसरात सध्या लोकांची वर्दळ नाही आणि फार कोणी तेथे राहत देखील नाही.त्यामुळे सकाळी साडे सात वाजता या घटनेची माहिती शेलू गावचे पोलीस मनोज रामदास पाटील यांना मिळताच त्यांनी नेरळ पोलिसांना त्याबाबत माहिती दिली होती.या घटनेत अन्य कोणी साक्षीदार नसल्याने पोलीस पाटील हे या खून प्रकरणाचे फिर्यादी आहेत.या खून प्रकरणाची माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील,पोलीस उपनिरीक्षक तात्या सावंजी हे तेथे पोहचले.त्यानंतर लगेचच पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर हे देखील पोहचले आणि त्यानंतर तपासाला गती मिळाली आहे.मात्र खून झाल्यानंतर पोलीस यंत्रणेला माहिती पोहचेपर्यंत मोठा कालावधी लोटला आहे. त्यामुळे आरोपी कपिलदेव मुन्ना भारती उर्फ सिंघनिया हा पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे.घटनेचा तपास पोलीस उपअधीक्षक घेरडीकर हे करीत असून या खून प्रकरणाने खळबळ माजली असून मयत ब्रिजभान यादव यांचे काही नातेवाईक बदलापूर येथे राहत असून त्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले आहे.


Popular posts
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
एम. सी.ई सोसायटीच्या इंग्लीश मिडियम स्कूल आयोजित क्रीडा करंडक स्पर्धेत 'सर सय्यद अहमद हाऊस' विजयी*                                                                                    
Image
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या