जातीयवाद करून हत्या करणाऱ्या आरोपीची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून विराज जगताप यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणेबाबत या सदर विषयाचे निवेदन AIMIM पक्षाच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना देण्यात आले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


.


महोदय,


         


पिंपरी चिंचवड :- शहरातील पिंपळे सौदागर येथील विराज विलास जगताप या २० वर्षीय मुलाचे सवर्ण मुलीशी असलेल्या प्रेमप्रकरणामुळे मुलीच्या कुटुंबियातील आरोपी हेमंत काटे,सागर काटे,रोहित काटे,कैलास काटे,जगदीश काटे, हे सर्व राहणार पिंपळे सौदागर येथील असून यांनी विराज जगतापची हत्या केली. आरोपी क्रमांक ५ जगदीश काटे यांनी दिनांक ०७/०६/२०२०रोजी रात्री १० वाजून ६ वाजता च्या सुमारास शिव बेकरी पिंपळे सौदागर पिंपरी चिंचवड या ठिकाणी बेकायदेशीर जमाव जमवून आमच्या मुलीवर प्रेम करतो या कारणावरून चिडून जाऊन छोट्या टेम्पोने विराज जगताप याच्या दुचाकीला धडक दिली तो खाली पडल्यानंतर पळून जात असताना टेम्पो मधील नमूद आरोपी हे हातामध्ये रॉड व दगड घेऊन उतरून त्यातील हेमंत काटे याने गोल लोखंडी रॉड मयताच्या डोक्यात मारला व सागर काटे याने पाठीत दगड मारला व रोहित काटे ,कैलास काटे,हर्षद काटे,व जगदीश काटे यांनी मयताचे हात पाय धरले व त्याच वेळेस जगदीश काटे पिडीतास म्हणला कि तू महार मांगाचा आहेस तुझी लायकी आहे का माझ्या मुलीवर प्रेम करायची तरी तू माझ्या मुलीवर प्रेम करतो का ? असे जातीवाचक शब्द बोलून तो पीडित विराज जगतापच्या अंगावर थुंकला.. यातील जखमी बेशुद्ध अवस्थेत उपचार घेत असताना मयत झाल्यानंतर सर्व आरोपी यांच्यावर ३०६/२०२० भादंवि कलम ३०२,१४३,१४७,१४८,१४९ अनुसूचित जाती जमाती कायदा २०१५ चे कलम १८८९ ३(१) ( r ) ( s ) ३(२) (va ) ३(२) ( v ) ६ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१) सह १३५ या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.


तरी AIMIM पार्टीच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे


१) हि केस तात्काळ फास्टट्रॅक कोर्टात चालवून जगताप कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा.


२) जगताप कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याने त्यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे.


३) जगताप कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी.


        सदर विषयांचे निवेदन AIMIM पक्षाचे महाराष्ट्र महासचिव अकील मुजावर साहेब,प्रवक्ते धम्मराज साळवे,महिला आघाडी अध्यक्ष अंजना गायकवाड,पिंपरी चिंचवड महिलाध्यक्ष अर्चना परब,सदस्य रौफ कुरेशी,शब्बीरभाई शेख राहुल थोरात महेश गायकवाड यांच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांना देण्यात आले.


            तरी आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात यास प्रसिद्धी देण्यात यावी हि आपणास नम्र विनंती


 


                                                                आपले विश्वासू


 


     अकील मुजावर                           


 प्रदेश महासचिव AIMIM