भिकू वाघेरे प्रतिष्ठानकडून "मुख्यमंत्री सहाय्यता निधीस" उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे एक लाखाचा धनादेश सुपूर्द

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


 पिंपरी, दि. 6 (प्रतिनिधी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या ३४ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करून कोविड विरोधातील लढ्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. हा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आला.


 


यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच कोविड विरोधातील लढ्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस रक्कम द्यावी, असे आवाहन केले होते. या आवाहनला प्रतिसाद देत प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी हा एक लाखाचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सूपूर्द केला. यावेळी संजोग वाघेरे पाटील यांच्यासह विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, नगरसेवक राजू मिसाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.


 


शनिवार दि. 6 जून रोजी भिकू वाघेरे यांचा ३४ वा स्मृतीदिन निमित्ताने महापौर उषा उर्फ माई  ढोरे यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते विठ्ठल (नाना) काटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक राहुल कलाटे, नगरसेविका उषा वाघेरे, माजी नगरसेवक प्रभाकर वाघेरे, रंगनाथ कुदळे, हनुमंत नेवाळे, गिरीजा कुदळे, शांती सेन पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, फजल शेख व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवर्षी स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमी यावर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यात 105 रक्तदात्यांनी रक्तदान केले, त्यांना हॅन्ड सॅनीटायझर, नॅपकिन व अल्बम 30 च्या आयुर्वेदिक गोळ्या कै. भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आल्या.


 


Popular posts
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
एम. सी.ई सोसायटीच्या इंग्लीश मिडियम स्कूल आयोजित क्रीडा करंडक स्पर्धेत 'सर सय्यद अहमद हाऊस' विजयी*                                                                                    
Image
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या