पुणे महानगरपालिकेमध्ये आरोग्य विभागाकडील वर्ग-१ व वर्ग-२ ची रिक्त पदे भरण्याकरिता सरळसेवेने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे

प्रेस नोट............................


 


पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


पुणे महानगरपालिकेमध्ये आरोग्य विभागाकडील वर्ग-१ व वर्ग-२ ची रिक्त पदे भरण्याकरिता सरळसेवेने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर जाहिरातीमधील न्यूरोसर्जन, कार्डीओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिक्षक (कमला नेहरू रुग्णालय), सहाय्यक आरोग्य अधिकारी, बालरोग तज, क्ष-किरण तज्ञ, नियोनाटोलॉजिस्ट/नवजात अर्भक तज्ञ, चेस्ट स्पेशालीस्ट, निवासी फिजिशियन, फिजिशियन, पीडियाट्रिक सर्जन, इंटेसिव्हिस्ट आणि निवासी वैद्यकीय अधिकारी या वर्ग-१ व वर्ग-२ मधील १३ संवर्गांची गुणांकनासह प्रारूप पात्र यादी / प्रारूप अपात्र यादी पुणे महानगरपालिकेच्या www.pmc.gov.in या संकेतस्थळावर आज दिनांक दि.३१/५/२०२० रोजी प्रसिद्ध केली आहे.


 


सदर बाबत आपल्या काही हरकती / सूचना असल्यास योग्य त्या आवश्यक पुराव्यानिशी २ दिवसात म्हणजे


दि ०२/०६/२०२० रोजी सायं ५.०० पर्यंत ई-मेल द्वारे (recruitment@punecorporation.org)


वर सादर कराव्यात. त्या नंतर कुठलीही तक्रार / हरकतीचा विचार केला जाणार नाही याची आपण नोंद घ्यावी.