कर्जत शहरात मोकाट माकडांचा हैदोस

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


.... 


दोन महिला आणि दोन पुरुष जखमी तर एका कुत्र्याचा मृत्यू


कर्जत,ता.24 गणेश पवार


                             कर्जत शहरात अन्नाच्या शोधात जंगलातून माकड आली आहेत.त्या माकडांनी गेली डिड महिना उच्छाद मांडला आहे.त्या माकडांनी धहरातील चार लोकांना आपले लक्ष केले असून त्याचवेळी तेथील एका कुत्र्याचा बळी गेला आहे.


                            जंगलातील तीन माकडे कर्जत शहरात मुक्तपणे वावरत आहेत,त्या माकडांनी मागील काही दिवस अन्न मिळविण्यासाठी धावपळ करणारे माकड हे आता त्रास बनली आहेत.या माकडांनी आता दररोज उच्छाद मांडत असून मनुष्य आणि प्राण्यावर हल्ला करू लागली आहेत. त्यांच्या हल्ल्यात दोन महिला आणि दोन पुरुष असे चार जण जखमी झाले असून दोन ते तीन कुत्र्यांनाही चावा घेऊन इजा पोहोचवली आहे.यातील एक कुत्रा मरण पावला आहे असून संबंधित जखमी व्यक्तींवर उपचार केले आहे,तसेच कुत्र्यांवरही उपचार सुरु आहेत.नागरिक भयभीत झाले असून स्थानिक रहिवाशी आणि कर्जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुकेश सुर्वे यांनी वन विभागाला सर्वप्रथम सूचना दिली असून कर्जत शहरातील आमराई परिसरात गेली काही दिवस माकडे येऊन वास्तव्य करीत आहेत त्यांचा प्रतिबंध करावा असे सूचित केले आहे.अन्न न मिळालेली माकडे हल्ला करीत असल्यान लहान मुले आणि महिला यांनी आपला रस्ता बदलला आहे.आपण वनविभागाला याबाबत माहिती दिली असून त्वरित त्या माकडांना पकडण्यात यावे अशी मागणी केली आहे.


                               याबाबत वनविभागाने माकडांना नागरिकांनी खायला दिल्यामुळे त्यांना येथील सवय झाली त्यामुळे ती आता जंगलात परतत नाहीत.त्यामुळे त्यातच त्यांना आता नागरिकांनी विरोध केल्यास ते हल्ले करीत आहेत,या माकडांना पकडण्यासाठी खोपोली वरून विशेष पथक बोलावण्यात आले आहे .