शेअर बाजारात वृद्धी; सेन्सेक्सने घेतली ३२९.१७ अंकांची बढत

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 



 


मुंबई, २७ जून २०२०: सलग दोन दिवस लाल रंगात व्यापार केल्यानंतर भारतीय शेअर बाजाराने शुक्रवारी सकारात्मक स्थिती दर्शवली. निफ्टी ०.१९% किंवा ९४.१० अकांनी वाढून १०,३८३.०० अंकांवर बंद झाला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्सनेही आज ०.९४% किंवा ३२९.१७ अंकांची वृद्धी घेत ३५,१७१.२७ वर व्यापार बंद केला.


 


एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापार सत्रात १६२९ शेअर्सनी नफा कमावला. तर १४१ शेअर्स स्थिर राहिले. १०४० शेअर्सचे मूल्य घसरले. बीपीसीएल (६.५०%), इन्फोसिस (६.६४%), टीसीएस (४.९२%), आयओसी (४.७६%) आणि इंडसइंड बँक (३.७६%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर भारती इन्फ्राटेल (२.८२%), बजाज फायनान्स (३.०९%), आयटीसी (३.०७%), टाटा मोटर्स (१.७३%) आणि कोटक महिंद्रा बँक (२.३५%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.


 


एफएमसीजी आणि फार्मा सेक्टर्सनी आज घसरण अनुभवली तर इतर सेक्टर्सनी हिरवा रंग दर्शवला. बीएसई मिडकॅप ०.२७% नी वाढले तर बीएसई स्मॉलकॅप ०.१९% नी वाढले.


 


भारतीय रुपयाच्या मूल्यात आज थोडा बदल झाला तरीही त्याने आजच्या व्यापारी सत्रात वाढीचे सत्र कायम ठेवले. भारतीय रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७५.६४ रुपयांचे मूल्य गाठले.


 


कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढतच असल्याने सोन्याच्या दरांनीही सलग तिसऱ्या दिवशी वाढ दर्शवली. सोन्याच्या किंमतीत चढ-उतार दिसून आला तरी स्पॉट गोल्डचे दर १७६० अमेरिकी डॉलरवर स्थिर होते.


 


जगातील विविध भागात कोव्हिड-१९च्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होऊनही जागतिक बाजाराने वृद्धी दर्शवली. नॅसडॅकने १.०९% ची, एफटीएसई १०० ने १.७२%, एफटीएसई एमआयबीने १.५२%, निक्केई २२५ ने १.१३%ची वाढ दर्शवली. तर हँग सेंगने आज ०.९३% ची घसरण अनुभवली.


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन
कर्जत तालुक्यातील खांडस येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून....
भगतसिंग कोशियारी यांना राष्ट्रपतींनी*  *परत बोलवावे यासाठी ऑन लाईन पिटीशन*
Image