केश कर्तनालय व्यावसायिक आणी लॉंड्री व्यावसायिक बांधवांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूच्या किटचे वाटप करण्यात आले

पुणे प्रवाह न्युज


 


*.*


----------------------------


दि. १ जुन २०२० पुणे 


संपुर्ण जगावर कोरोना सारखे महाभयंकर संकट कोसळलेले असताना गरिब,गरजू नाभिक व लॉंड्री व्यवसाय करुन जगणाऱ्या बांधवांचे हाल होत आहेत या जाणिवेतून प्रभाग क्रमांक 8 औंध- बोपोडीच्या कार्यक्षम नगरसेविका व रिपाइं गटनेत्या *सौ.सुनिता परशुराम वाडेकर व मित्र परिवार तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया (आठवले )* च्या वतीने केश कर्तनालय व्यावसायिक नाभिक बंधू आणि लॉंड्री व्यावसायिक बांधवांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.


याप्रसंगी बोलताना नेते परशुराम वाडेकर म्हणाले, *शासनाने कोरोनाच्या या काळात केलेल्या लॉकडाउनचा हा चौथा टप्पा आहे,अशा अवस्थेत हातावर काम करुन उदरनिर्वाह चालविणारे कामगार बंधु यांचे हाल होत आहेत आणि अशा या दयनीय परिस्थितीत शासनानेही या बांधवांची दखल घेतलेली नाहीय.म्हणून एक भेट म्हणून आम्ही या नाभिक व लॉंड्री व्यावसायिक बांधवांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू वाटप केल्या आहेत.तसेच या माध्यमातून मा.पंतप्रधान व मुख्यमंत्र्यानाही तसेच राज्याचे समाजकल्याण मंत्री यांनाही विनंती करीत आहोत की या हातावर व्यवसाय असणाऱ्या कामगार बंधूना कमीत कमी दहा हजार रुपयांची मदत करावी. सध्याच्या या दयनीय परिस्थितीत जर शासनाने मदतीचा हात दिला नाही तर ही सर्व जनता रस्त्यावर उतरेल व प्रसंगी अराजक स्थिती निर्माण होईल. जात उतरंडीतून निर्माण झालेला हा व्यवसाय असुन कुठल्याही उपक्रमात या व्यवसायाला स्थान दिले गेलेले नाही; तरी या गंभीर वातावरणातदेखील मायबाप सरकाराने या बांधवांची दखल घ्यावी.* 


या प्रसंगी....


*सौ.सुनिता परशुराम वाडेकर*


(नगरसेविका व रिपाई गटनेत्यां पुणे मनपा) 


*मा.परशुराम वाडेकर*


(अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी रिपाई (आ)


*मा. उमेश कांबळे*


( अध्यक्ष पुणे जिल्हा युवक आ रिपाई )


*सामाजिक कार्यकर्ते..*


भिमराव वाघमारे विजय सोनीगरा दत्ता जाधव अप्पासाहेब वाडेकर अविनाश कदम अनिल जोशी जोएल आन्थोनी विजय ढोणे निलेश वाघमारे राजेश शिंदे अकबर शेख,नितिन जाधव अॅड.ज्ञानेश जावीर विशाल कांबळे बाळू मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते..