बापूसाहेब भोसले यांच्या वाढदिवसा निमित्ताने शहिदांना अभिवादन करीत, चीनी मालावर बहिष्कार करत आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 प्रवाह न्युज पोर्टल


 


बापूसाहेब भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण! 


 


पुणे : राजश्री शाहू महाराज यांची जयंती व दलित पँथर ऑफ इंडियाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष व संयुक्त राष्ट्र तिबेट मुक्तीचे भारताचे राजदूत बापूसाहेब भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भारत-चीन सीमेवर या हल्ल्यात भारतीय शहीद वीर जवान सैनिक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच धोकेबाज चीनचा निषेध करत चीनचा झेंडा व जिविंगचा फोटो जाळण्यात आला. देशातील कोरोना संकटात गोरगरीब जनतेचे तीन महिन्याचे मोफत रेशन कीटचे वाटप करण्यात आले. तसेच पोलिस, रुग्णसेवा करणारे कोरोना योद्ध्यांना मास्क वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम राष्ट्रीय अध्यक्ष बापू भोसले यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी संघटनेचे संघराज गायकवाड, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष शाहरुख पठाण, युवा आघाडी पुणेचे महादेव गायकवाड, डॉ. जयश्री तोडकर ॲड. दिप्ती काळे, सर्वाधिकार पत्रकार संघाच्या अध्यक्षा कांचन बडवणे, आप्पा ढगे, वंदना दरपेली, द्रौपदी पाटील आणि कार्यक्रमाचे आयोजक तसेच प्रदेश कार्याध्यक्ष इलियास शेख आदी उपस्थित होते.