आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी, शिक्षक व कर्मचार्‍यांनी कुटुंबासह घरी केला योगाभ्यास

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


कृपया प्रसिद्धीसाठी दि. 21 जून 2020


 


आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या



 


पुणे, दिः21 जूनः आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्षी कोविड-19 मुळे संपूर्ण जगात कोणतेही सामूहिक कार्यक्रम होत नाही. अशा वेळेस एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड व कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचार्‍यांनी आपापल्या घरी राहूनच सह कुटुंबासह 1 ते दीड तास योगाभ्यास योगाभ्यास केला.


या निमित्ताने प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ आमच्या संस्थेमध्ये 1996 पासून विद्यार्थी व शिक्षकांना दर वर्षी 24 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत योगाचे प्रशिक्षण दिले जाते. भारताला हजारो वर्षाची परंपरा असलेल्या योगाचे महत्व जगाला आज कळले आहे. त्यामुळेच संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जात आहे. योग ही भारताने दिलेली जगाला सर्वात मोठी देणगी आहे.”


“योग शरीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी लाभदायक आहे. योग केल्याने जीवनातील ताण तनाव कमी होतो. त्याच बरोबर आपली मानसिकता चांगली राहते व आपले मन प्रसन्न राहते. व त्यामुळे आपल्याला शांतता मिळते. त्यामुळे प्रत्येकाने दररोज योग केला पाहिजे.”


राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, “ आमच्या विद्यापीठामध्ये योगाचे प्रशिक्षण आठवड्यातून एक दिवस विद्यार्थ्यांना दिले जात आहे. विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास व्हावा हा यामागचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थी हा देशाचा भविष्य असल्याने तो फीट आणि हेल्दी राहणे गरजेचे आहे. रोज योगाभ्यास केल्याने आरोग्यात सुधारणा होऊन वजन कमी होते, तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढून शरीरात लवचिकता वाढते.”


एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एन.टी.राव, प्र-कुलगुरू प्रा. डी.पी. आपटे, डॉ. आर.एम.चिटणीस, डॉ. मिलिंद पांडे व कुलसचिव डॉ. प्रशांत दवे यांनी ही आपल्या कुटुंबासहीत योगभ्यास केला.


 


 


 


 


 


जनसंपर्क विभाग,


माईर्स एमआयटी, पुणे