कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हयातील विविध न्यायालयांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात.                                                - जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हयातील विविध न्यायालयांमध्ये 


                                     पुणे, दि. 7 : कोविड - 19 विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने दैनंदिन व्यवहार पुन:श्च सुरु करणे आणि बंधने टप्प्या टप्प्याने शिथील करण्याची कार्यवाही चालू आहे. त्याचप्रमाणे पुणे जिल्हयातील विविध न्यायालयांमध्ये लवकरच कामकाज सुरु होऊन अभ्यांगतांची संख्या वाढणार असल्याने कोविड - 19 या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने उपलब्ध नसणा-या सुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. 


 त्यानुषंगाने जिल्हयातील / तालुक्यातील सर्व प्रकारच्या विविध न्यायालयातील मा. न्यायमूर्ती यांच्या न्यायालयात जाणे-येणेसाठी केवळ एकच मार्ग उपलब्ध असणार याची खात्री करुन कोविड- 19 या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने तेथे बेसिन, टॅबवॉटर व पाण्याची उपलब्धता, टँक इत्यादी व्यवस्था करण्याकरीता तसेच टँकमध्ये पाणी राहील याची खात्री करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणेच्या कार्यकारी अभियंता, यांनी त्यांच्या अधिनस्त सर्व जिल्हा व तालुकास्तरीय यंत्रणांना सुचित करण्याकरीता त्यांना सूचीत करण्यात आले आहे.


 जिल्हा नियोजन अधिकारी यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशव्दाराजवळ सॅनेटायझर मशीनची उभारणी करण्याकरीता त्वरीत निधी उपलबध करुन देण्यात यावा. जिल्हयातील विविध न्यायालयातील मा. न्यायमुर्ती यांचेकडून कोविड-19 विषाणूचा संसर्ग कमी करण्याच्या अनुषंगाने नमूद सुविधा (जसे हँडवॉश- साबण इ.) उपलबध करुन घेण्यासाठी निधीबाबत मागणी उपलब्ध करुन घेण्याबाबत तसेच हा खर्च भागविण्यासाठी जिल्हा‍ नियोजन समिती मार्फत निधी उपलब्ध करुन देण्याबाबत सूचीत करण्यात आले आहे. हा निधी कोविड विषयावरील उपाय योजनासाठीच्या (Recurring) खर्चाव्यतिरिक्त इतर बाबींसाठी खर्च करता येणार नाही.


 सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार जि. पुणे, सर्व गटविकास अधिकारी, सर्व मुख्याधिकारी नगर पंचायत, नगर परिषद, नगरपालिका यांनी कोर्टाच्या इमारतीस असणारा पाणी पुरवठा चालू आहे किंवा नाही याची खात्री करणे, तसेच हात धुण्यासाठी नळाला मुबलक पाणी उपलब्ध असणे, पाण्याचा पुरवठा विंधन विहिरींव्दारे असल्यास त्याचा पुरवठा व्यवस्थित होत असल्याबाबत खात्री करण्याबाबत व विंधन विहिरी खराब असल्यास दुरुस्त करुन घेण्याबाबत. तसेच पाण्याचा स्त्रोत नसल्यास विंधन विहिर घेण्यात यावी. तथापी विंधन विहिरीमध्ये पाणी उपलब्ध होत नसल्यास टॅंकर अथवा इतर कोणत्याही माध्यमातून पाण्याची तात्काळ व्यवस्था संबंधित तालुक्यातील तहसिलदार यांनी कार्यवाही करण्याकरीता तसेच त्यांनी प्रत्येक न्यायालयातील प्रमुख न्यायाधिश यांची तात्काळ भेट घेण्याकरीता सूचीत करण्यात आलेआहे. 


 पुणे व पिंपरी चिंचवड महानगर पालिका, जिल्हा शल्यचिकित्सक पुणे, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, पुणे यांनी 20 लिटर सॅनिटायझर व इतर तत्सम साहित्य मागणीप्रमाणे तात्काळ विविध न्यायालयांमध्ये (जिल्हा न्यायालय/ कौटुंबिक न्यायालय/ तालुका न्यायालय/कामगार न्यायालय/सहकार न्यायालय/हरीत न्यायाधिकरण इत्यादी सर्व न्यायालये) यांना उपलब्ध करुन देण्याविषयी त्यांना सूचीत करण्यात आले आहे.


 पुणे व पिंपरी चिंचवड महानगर पालिका, जिल्हा परिषद, पुणे यांनी कोविड-19 या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने काळजी घेणेबाबत सुचना फलक जिल्हयातील सर्व न्यायालयांच्या इमारतीच्या प्रवेशव्दारावर योग्य प्रकारे लावण्यात यावे.


 सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार जि. पुणे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे यांनी वरील व इतर सर्व बांधकामाविषयक बाबींसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी मा. न्यायमूर्ती यांचेशी समन्वय साधून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्या. तसेच तहसिलदार व सर्व उपविभागीय अधिकारी यांनी मा. न्यायमुर्ती यांचेशी भेट घेऊन सदर सुविधांमध्ये त्रुटी राहणार नाही याची दक्षता घेण्याबाबत त्यांना सूचीत करण्यात आले आहे.


 सर्व विभाग प्रमुखांनी सुचनानुसार कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तात्काळ सादर करावा, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी कळविले आहे.


      0000