स्व. भिकू वाघेरे पाटील यांच्या 35 व्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


  


 


 


पिंपरी ५ जून


 


पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या 35 व्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दिनांक ६ जून 2020 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती कै. महापौर भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठान व पिंपरी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली आहे.


 


सकाळी ९ वा. कै. महापौर भिकू वाघेरे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी उपमहापौर तुषार हिंगे स्थायी समितीचे सभापती संतोष लोंढे विरोधी पक्षनेते नाना काटे आयुक्त श्रावण हर्डीकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय वाघेरे पाटील उपस्थित राहणार आहेत.


 


कोरोना पार्श्वभूमीवर इतर सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत फक्त सकाळी ९:३० ते दुपारी २ या काळात रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. तसेच कै. महापौर भिकू वाघेरे पाटील यांच्या स्मरणार्थ रुपये एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे