*वृक्ष संवर्धन काळजी गरज – दिग्दर्शक रामकुमार शेडगे* * ( ५० फळ झाडे भेट देवून केले वृक्षरोपण )*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


Respected sir / Madam,


 


Press Release


  


                     अ.ब.क या बहुचर्चित चित्रपटाचे दिग्दर्शक रामकुमार गोरखनाथ शेडगे यांनी हणबरवाडी ( मसूर ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी ५० फळे झाडे भेट देवून वृक्षारोपण केले. या प्रसंगी मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश लोखंडे, मसूर पोलीस स्टेशनचे स.फौजदार सतीश मयेकर, उंब्रज येथील स्टेक बँकच्या मॅनेजर आराधना सरोदे, सातारा पोलीस दलातील सिद्धनाथ शेडगे हे प्रमुख पाहुणे होते.       


 


                       या प्रसंगी बोलतात दिग्दर्शक रामकुमार शेडगे म्हणाले कि, आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या काळात मानवी जीवन वेगवान बनले आहे. दुसऱ्या बाजूला मात्र पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोकण्यासाठी व मानवाला प्रदूषण मुक्त जीवन जगण्यासाठी वृक्षारोपण हि आजच्या काळाची गरज बनली आहे. जर वृक्षारोपण केले तर आपणास प्रदूषण मुक्त जीवन जगता येईल. निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेता येईल. पाने, फुले, वेली यांच्याशी नाते निर्माण करता येईल. यासाठी वृक्षरोपण करणे हि आवश्यक बाब आहे, असे प्रतिपादन रामकुमार शेडगे यांनी व्यक्त केले.


 


                        डॉ. सतीश लोखंडे म्हणाले कि दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांनी शाळेत केलेली फळ झाडांची लागवड उपयुक्त आहे. या ठिकाणी त्यांनी आंबा, पेरू, डाळींब, चिंच, जांभळ अशी विविध प्रकारची झाडे शाळेतील मुलांना फायदेशीर ठरेल. भविष्यात शाळेतील विध्यार्थीना या फळातून पोषक तत्वे मिळतील. क, अ, ई अशी विविध जीवनसत्वे त्यांना मिळतील.


 


                    शाळेच्या आवारात ५० खड्डे खोदून, शाळेचा परिसर स्वच्छ, करून वृक्षारोपण केले यासाठी स्वतः रामकुमार शेडगे, शिव शंभो तालीम हणबरवाडी, विनोद पवार, सिद्धनाथ शेडगे, प्रणव साळुंखे, विजय शेडगे, आदित्य पवार यांनी परिश्रम घेतले.


 


                   कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक संजय शेजवळ यांनी केले. तर समारोप पवार सर यांनी केला. यावेळी नानासो पवार, संतोष देसाई, शहाजी पवार, ग्रामसेवक शिवाजी जाधव, मोहन थोरात, नामदेव पवार, सुर्यकांत बाजारे, नितीन पवार गावातील महिला व गावचे ग्रामस्त उपस्थित होते.          


 


*फोटो ओळ – वृक्षारोपण करताना दिग्दर्शक रामकुमार शेडगे डावीकडून संजय शेजवळ, सिद्धनाथ शेडगे, सतीश मयेकर आदी मान्यवर.....*


Popular posts
*माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस ना.डॉ.गोऱ्हे यांनी केले पुष्पहार अर्पण...*
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
कोरोना विषयी काळजी म्हणून .......दशक्रिया विधीस उपस्थित न राहणे बाबत*...
Image
माथेरानच्या डोंगरातील कड्यावरचा गणपती खुणावतोय.. निसर्गराजा गणपती नावाने फेमस गणपती बाप्पा मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना
श्री शंतनु भामरे यांची *राष्ट्रीय चेअरमन संशोधन आणि विकास सेल आणि राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी* निवड - अखिल भारतीय सुवर्ण संस्था सामाजिक विकास व संशोधन संस्था ( ABSSVSS)