पुणे विभागातील 12 हजार 639 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.... विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुणे विभागातील 12 हजार 639 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी 


विभागात कोरोना बाधित 20 हजार 416 रुग्ण-  


    पुणे दि. 23 :- 0पुणे विभागातील 12 हजार 639 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 20 हजार 416 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 6 हजार 909 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 868 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 467 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.91 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.25 टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.


  यापैकी पुणे जिल्हयातील 16 हजार 385 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 9 हजार 791 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 986 आहे. कोरोनाबाधित एकूण 608 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 355 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.76 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.71 टक्के इतके आहे.


 कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण484 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 443, सातारा जिल्ह्यात 6, सोलापूर जिल्ह्यात 28 , सांगली जिल्ह्यात 03 तर कोल्हापूर जिल्ह्यात 04 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.


  सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 844 रुग्ण असून 668 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 137 संख्या आहे. कोरोनाबाधित एकूण 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


  सोलापूर जिल्हयातील 2 हजार 154 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 310 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 640 संख्या आहे. कोरोना बाधित एकूण 204 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


  सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 291 रुग्ण असून 186 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 96 आहे. कोरोना बाधित एकूण 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


  कोल्हापूर जिल्हयातील 742 कोरोना बाधीत रुग्ण असून 684 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 50 आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


 आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 40 हजार 575 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 38 हजार 889 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1 हजार 686 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 18 हजार 148 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 20 हजार 416 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.  


              


( टिप :- दि. 23 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )


                                 0000


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन
कर्जत तालुक्यातील खांडस येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून....
भगतसिंग कोशियारी यांना राष्ट्रपतींनी*  *परत बोलवावे यासाठी ऑन लाईन पिटीशन*
Image