मा. नवल किशोर राम पुणे जिल्हाधिकारी टँप टेनच्या यादीत नाव सामील

पुणे प्रवाह न्युज पोर्टल........


 


फेम इंडिया मैगजीनने एशिया पोस्टसोबत देशात सर्वे करून 742 जिल्हाधिकारी यांचे काम पाहिले. यातून उत्कृष्ट काम करणारे 50 जिल्हाधिकारी निवडण्यात आले. यात महाराष्ट्रातून पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे टॉप टेनमध्ये एकटे निवडले गेले आहेत.


 जिल्हाधिकारी नवल किशोर सर यांची कामाची पद्धत अद्भुत आहे. आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे पूर्ण ऐकून घेणे हा स्वभाव आणि त्यावर तात्काळ तोडगा काढणे ही कामाची पद्धत आहे.


पुणेसारख्या मोठ्या शहराला कोरोनाच्या काळात हाताळणे ही साधी गोष्ट नव्हती. पण आपत्ती काळात अनेक जिल्ह्यात त्यांनी काम केले असल्याने नियोजनात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. योग्य नियोजन हे त्यांच्या यशाचे गमक आहे. आज देशातील 724 जिल्ह्यातून टॉप टेनमध्ये त्यांचे नाव आले. असे अधिकारी प्रशासनात असले की सरकार आपल्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवणे सहज शक्य होते, शिवाय आपत्ती काळात लोकांचे हाल कमी होतात.


त्यांनी कायम सामान्य लोक डोळ्यासमोर ठेवूनच कामकाज केले आहे. भविष्यातही ते आपल्या कामाचा केंद्रबिंदू सामान्य माणूसच ठेवतील, यात तिळमात्र शंका नाही.