मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन,व प्रतिबंधित क्षेत्रातील कामकाजाबाबत मा,गृहमंत्री यांचेकडून प्रशंसा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


कृपया प्रसिद्धीकरिता,


,


मा,ना,श्री,अनिल देशमुख,गृहमंत्री,महाराष्ट्र्र राज्य,यांनी आज येरवडा परिसरातील पुणे महापालिकेच्या अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनातील स्वाब सेन्टरची पाहणी केली,


पुणे मनपा व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्तिक रित्या या ठिकाणी नागरिकांचे घशातील स्त्रावाचे नमुना चाचणी घेण्यात येते,


येथील कामकाजाबाबत मा,अतिरिक्त मनपा आयुक्त ( जनरल ) रुबल अगरवाल यांनी माहिती दिली,


सदरच्या उपक्रमाबाबत माहिती घेतल्यानंतर मा,ना,अनिल देशमुख यांनी या स्वाब चाचणी केंद्राच्या कामकाजाची प्रशंसा केली,


याप्रसंगी मा,आमदार सुनील टिंगरे,मा,डॉ, सिद्धार्थ धेंडे,मा,ऍड,अविनाश साळवे,सहमहापालिका आयुक्त विजय दहीभाते,मनपा सहाययक आयुक्त विजय लांडगे,राजेश बनकर,डॉ,माया लोहार,डॉ,नील, भारतीय जैन संघटनेचे अमित लुंकड,व त्यांचे सर्व सहकारी,तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी पंकज देशमुख,पोलीस निरीक्षक युनूस शेख,व अन्य पोलीस अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते,


कै,बा,स,ढोलेपाटील क्षेत्रीय कार्यालय परिसरा अंतर्गत ताडीवाला रस्ता येथील पंचशील चौक भागातील प्रतिबंधित क्षेत्राची मा,ना,अनिल देशमुख यांनी पाहणी केली,


याप्रसंगी अतिरिक्त मनपा आयुक्त ( जनरल ) मा,रुबल अगरवाल यांनी सविस्तर माहिती दिली,


या परिसरात कामकाज करणाऱ्या स्पेशल पोलीस फोर्स चे प्रतिनिधी तसेच स्वयंसेवी संस्था प्रतिनिधि, सफाई कर्मचारी,मनपा सहाययक आयुक्त,व परिमंडळ अधिकारी यांचेशी त्यांनी चर्चा केली,


या भागातील दैनंदिन स्वच्छता कामे,सुमारे ३४,सार्वजनिक स्वच्छतागृहातील स्वच्छता कामे,अंतर्गत व बाहेरील स्वच्छता,निर्जंतुकीकरण,syanitiser, वापर,सर्व पायाभूत सुविधा,औषध फवारणी, व उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे या परिसरातील बाधित रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यात यशस्वी झाल्याचे मनपा सहाययक आयुक्त दयानंद सोनकांबळे यांनी याप्रसंगी सांगितले,


या भागातील प्रतिबंधित क्षेत्रात करण्यात आलेले दैनंदिन स्वछता विषयक कामे,नागरिकांमधील जनजागृती,क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी व आरोग्य कर्मचारी,सफाई कर्मचारी यांच्या नियोजनामुळे येथील रुग्ण संख्यावर नियंत्रण आणून संख्या कमी करण्यात यश मिळत असल्याबद्धल मा,ना,अनिल देशमुख,गृहमंत्री,महाराष्ट्र राज्य ,यांनी याप्रसंगी प्रतिबंधित क्षेत्रात करण्यात आलेल्या नियोजनाची प्रशंसा केली,


याप्रसंगी प्रभागातील मा,सभासद श्रीमती लताताई राजगुरू,मा,प्रदीप गायकवाड,सहमहापालिका आयुक्त विजय दहीभाते,महापालिका सहाययक आयुक्त दयानंद सोनकांबळे,वरिष्ठ पोलीस अधिकारी पंकज देशमुख,पोलीस निरीक्षक युनूस शेख,व अन्य अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते,


--संजय मोरे,


माहिती व जनसम्पर्क अधिकारी,


पुणे महानगरपालिका,


०७/०६/२०२०,


Popular posts
कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर 5 टक्के कॅशबॅक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहनधारकांसाठी 11 जानेवारी, 2021 पासून सवलत योजना
झीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*
BLaCK PAPPER PANT*💕💕💕
Image
मानव आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उत्तर प्रदेश हाथरस येथील "मनिषा वाल्मिकी" दलित पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंड गार्डन चाैकात कँन्डल लावून श्रद्धांजली वाहण्यात आली...
Image
राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩     !! निलेश म निम्हण मित्र परिवार !!........... दिवस_ 33...             दिनांक 1/5/2020
Image