*पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाल्यांची पुणे शहराचे महापौर मा. मुरलीधर मोहोळ यांचेकडून पाहणी करण्यात आली, त्यावेळी औध रस्ता परिसरातील चंद्रमनी वसाहती समोरील नाल्यातील अडथळा दूर करणे,व बोपोडी पुलाखालील राडारोडा व या भागातील चिकन मटण विक्रेते यांचेकडून येथे टाकण्यात येणारा कचरा काढनेत यावा असे मा,सौ,सुनीता वाडेकर,विजय शेवाळे,मा,प्रकाश ढोरे, यांनी मागणी केली.

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


कृपया प्रसिद्धीकरिता,


०६/०६/२०२०,


पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाल्यांची मा,महापौर यांचेकडून पाहणी,


कात्रज ते आंबील ओढा व लगतच्या तसेच अन्य परिसरातील नाल्यांच्या सफाई कामांची आज मा,महापौर मुरलीधर मोहोळ व मा,महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पाहणी केली,


पाहणी प्रसंगी मा,उपमहापौर सौ,सरस्वती शेंडगे,स्थायी समिती अध्यक्ष मा,हेमंत रासने,सभागृह नेते मा,धिरज घाटे,विरोधी पक्षनेत्या मा,सौ.दिपाली धुमाळ,तसेच मा,अतिरिक्त मनपा आयुक्त रुबल अगरवाल,मा,अतिरिक्त आयुक्त शांतानु गोयल,शहर अभियंता प्रशांत वाघमारे,मुख्य अभियंता विजय कुलकर्णी,श्रीनिवास कंदुल,अधिक्षक अभियंता प्रवीण गेडाम,अग्निशमन दल प्रमुख प्रशांत रणपिसे,उपायुक्त माधव देशपांडे,सुश्मिता शिर्के,सहमहापालिका आयुक्त ज्ञानेश्वर मोलक,शिवाजी लंके,संजय गावडे,विजय शिंदे,सुरेश जगताप,अशोक घोरपडे,जयंत भोसएकरव अन्य अधिकारी उपस्थित होते,


मा,महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज शहरातील विविध ठिकाणी नाल्यांची पाहणी करून तेथील मा, पदाधिकारी व मा,सभासद, मा,महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, मा,रुबल अगरवाल,मा,शांतानु गोयल व संबंधित अधिकारी यांचेशी सविस्तर चर्चा केली,


या संदर्भात मा,महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले कि, पाहणी करण्यात आलेल्या बहुतांश नाल्यांची मोठ्या प्रमाणावर सफाईचे कामे झालेली आहेत,


ज्या ठिकाणी अद्याप हि काही प्रमाणात कामे करणे आवश्यक असून उर्वरित कामे जलदरीत्या पूर्ण करण्याचे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले,दरम्यान त्यांनी सदर परिसरासरातील संबंधित मा,सभासदांशी कामकाज संदर्भात चर्चा केली,


त्यांनी सांगितले कि, मागील वर्षीच्या अनुभवानुसार यंदाचे वर्षी पुनरावृत्ती होऊ नये याकरिता मा,महापालिका आयुक्त,मा,पदाधिकारी,व संबंधित अधिकारी यांचेशी पहाणी करण्यात येत आहे,


पाहणीकरतेवेळी उर्वरित कामे,तेथील अडचणी,आवश्यक मान्यता,तांत्रिक बाबींची चर्चेने तातडीने सोडवणूक करणे , व उर्वरित नालेसफाई कामे जलदरीत्या पूर्ण करणे व मागील वर्षाची पुनरावृत्ती होऊ नये त्यामुळे पाहणी करण्यात येत असल्याचे मा,महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पाहणी प्रसंगी सांगितले,


मा,महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले कि,


मागील वर्षीच्या पूरपरिस्थिती बाबत पुनरावृत्ती टाळणेकरिता कात्रज तलाव स्वच्छता मोहिमेअंतर्गत युद्धपातळीवर तलावाची स्वच्छता करण्यात आली असून पाण्याची पातळी खाली करण्यात आली आहे,तसेच पाण्याची वहन क्षमता अधिक सुलभ व जलद होण्याकरिता सायफन पद्धती नुसार नियोजन करण्यात आलेले आहे,कात्रज ते दत्तवाडी परिसरातील नालेसफाई पूर्णांशाने करण्यात आलेली आहे,काही उर्वरित कामे अर्थात राडारोडा,अडथळे,तातडीने काढणेबाबत संबंधितांना आदेशीत केले आहे,त्यामुळे पुनरावृत्ती होणार नाही याची सर्वतोपरी दक्षता घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले,


सिंहगड रस्त्यावरील पु,ल देशपांडे उद्यान,व ब्रह्मा हॉटेल समोरील नाल्यातील भिंत काढून घेणे,ड्रेनेज लाइन बदलणे,याबत मा,सभासद प्रसन्न जगताप व श्रीमती ज्योती गोसावी यांनी याप्रसंगी सांगितले,


वडगाव पूल येथील नाल्यात संरक्षक भिंत बांधणे, व स्मशानभूमीतील कामे जलदरीत्या पूर्ण करणे,याबाबत मा.हरिदास चरवड मा.सौ,राजश्री नवले,मा,राजाभाऊ लायगुडे,मा,सौ,नीता दांगट यांनी याप्रसंगी चर्चा केली,


येथील फरशी पूल,रुंदीकरण,संरक्षित भिंत बांधणे व वहन क्षमता अडथळा दूर करणेकरिता प्रवाहातील वृक्ष मान्यतेनुसार काढून टाकणे,याबाबत मा,शंकर पवार, मा,आनंद रिठे, मा,सौ,अनिता कदम,यांनी चर्चा केली,


मित्र मंडळ चौक व ट्रेझर पार्क येथील नाला रुंदीकरण करणे बाबत मा,महेश वाबळे मा,आबा बागुल, मा, सुभाष जगताप,


मा सौ,स्मिता वस्ते यांनी चर्चा केली, 


कात्रज तलाव पहाणी प्रसंगी मा,वसंत मोरे,मा,प्रकाश कदम,मा,सौ मनीषा कदम,मा,सौ मानसीताई देशपांडे, मा सौ वृषाली कामठे यांनी मा,महापौर यांचेशी चर्चा केली,तलाव परिसरातील पाइपलाइन खालील राडारोडा काढणे,व संरक्षक भिंत बांधण्याची त्यांनी मागणी केली,आंबील ओढा दत्तवाडी परिसरा तील नाला कामाची पाहणी करताना उपमहापौर सौ सरस्वती शेंडगे,व सभागृह नेते मा,धिरज घाटे यांनी याप्रसंगी उर्वरित कामे जलद करणे बाबत चर्चा केली,


भवानी पेठेतील सोनावणे हॉस्पिटल समोरच्या नाल्यातील कचरा काढून घेण्यात यावा असे मा,अविनाश बागवे,मा,विशाल धनवडे,मा,सौ,मनीषा लडकत, मा,अजय खेडेकर,मा,सौ,अर्चना पाटील,मा,रफिक शेख,यांनी चर्चा केली,


गणेश पेठेतील बुरुड पूल येथील नाल्यातील चॅनेल काढून रुंदी वाढविणे व पाइपलाइन उचलनेत यावी असे वनराज आंदेकर यांनी सांगितले,


मॉडेल कॉलनी पुणे १६,येथील नाला व शिवाजीनगर येथील पटेल टाइल्स नजीकच्या नाल्यास पहाणी प्रसंगी मा,आदित्य माळवे,मा,ज्योस्तना एकबोटे,मा,संदीप काळे,मा,सोनाली लांडगे यांनी येथील नाल्याची रुंदी वाढविणे व गेट बसविणेबाबत सूचित केले,व प्रवाहातील अडथळा ठरणारी वृक्ष मान्यतेनुसार काढणेबाबत सूचित केले,


औध रस्ता परिसरातील चंद्रमनी वसाहती समोरील नाल्यातील अडथळा दूर करणे,व बोपोडी पुलाखालील राडारोडा व या भागातील चिकन मटण विक्रेते यांचेकडून येथे टाकण्यात येणारा कचरा काढनेत यावा असे मा,सौ,सुनीता वाडेकर,विजय शेवाळे,मा,प्रकाश ढोरे, यांनी सांगितले,


ब्रेमेन चौक , आशियाना पार्क,विधाते वस्ती, ज्युपिटर हॉस्पिटल येथील पहाणी प्रसंगी मा,सौ,ज्योती कळमकर,मा,सौ,अर्चना मुसळे,मा,सौ स्वप्नाली सायकर, मा,अमोल बालवडकर यांनी नालेसफाई,अतिक्रमणे काढणे,संरक्षक भिंत बांधणे, याबाबत चर्चा केली,


-मा,महापौर कार्यालय,


पुणे महानगरपालिका,


०६/०६/२०२०,