बँकिंग, ऑटो शेअर्सच्या बळावर बाजारातील तेजी कायम

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


  


मुंबई, २९ मे २०२०: बेंचमार्क निर्देशांक सलग दुस-या दिवशी गुरुवारी मजबूत स्थितीत बंद झाले. सेन्सेक्स ५९५.३७ अंक किंवा १.८८ टक्क्यांनी वाढून ३२,००.५९ अंकांवर बंद झाला. निफ्टीदेखील १७५.१५ अंकांनी म्हणजेच १.८८ टक्क्यांनी पुढे जात ९,४९०.१० अंकांवर बंद झाला. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की, गुरुवारी व्यापार बँकिंग स्टॉक्सच्या वृद्धीने सुरु झाला. यात एचडीएफसी बँकेने नेतृत्व केले. या शेअरचे मूल्य ४.८५%ने वाढले. इतर सेक्टरल स्टॉक्सनीही उत्तम कामगिरी केली. यात रिलायन्स इंडस्ट्रीज (१.७६%) आणि मारुती सुझूकी (३.९२%) यांचाही समावेश होता.


 


झी एंटरटेनमेंट (९.५८%), हिरो मोटोकॉर्प (५.१८%), इचर मोटर्स (७.३४%), इंडसइंड बँक (४.१५%) आणि एलअँडटी (५.७८%) हे निफ्टीच्या टॉप गेनर्समध्ये सहभागी होते. तर टॉप लूझर्समध्ये विप्रो (०.९२%०), जेएसडब्ल्यू स्टील (-०.४३%), सिपला (-०.५२%), आयटीसी (-०.६०%) आणि बीपीसीएल (-०.१४%) यांचा समावेश होता. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्सने १ टक्के मूल्यवाढ झाल्याची नोंद केली.


 


लॉकडाउनचे निर्बंध शिथिल:


 


महामारीमुळे बाजाराला अधिक फटका बसला. लॉकडाउनचे निर्बंध अनेक देशांमध्ये कमी होत असल्यामुळे तसेच आर्थिक घडामोडी पूर्ववत होत असल्यामुळे इक्विटी मार्केटचा पाया अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सरकार आणि मध्यवर्ती बँकांकडून प्रोत्साहनपर योजना दाखल होत आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेतील मागणी वाढू शकते. याच कारणामुळे तेलाच्या किंमतीही भविष्यात वाढू शकतात.


 


जून महिन्याच्या अखेरीस मार्केट ९७००ची पातळी गाठेल, अशी आशा आहे. जोपर्यंत ही पातळी ९००० च्या वर कायम राहील, व्यवसाय बुल मार्केटमध्ये मध्यम स्तरावर राहतील.


 


बुधवारी भारतीय रुपयाची ७५.९० प्रति डॉलरने सुरुवात झाली. तो ७५.७५ रुपयांवर बंद झाला. आज तो ७५.७५ रुपये प्रति डॉलर एवढ्या किंमतीवर बंद झाला, हे मूल्य थोडे खालावलेले आहे.