लॉक डाऊन काळात  भारती विद्यापीठ  आय एम ई डी मध्ये     प्रभावी इंटरऍक्टिव्ह ई -लर्निंग*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेस नोट 


*लॉक डाऊन काळात  भारती विद्यापीठ  आय एम ई डी मध्ये     प्रभावी इंटरऍक्टिव्ह ई -लर्निंग*
 
पुणे :


  कोरोना विषाणू साथीच्या लॉक डाऊन काळात   भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेन्ट(आय एम ई डी) मध्ये इंटर ऍक्टिव्ह ई -लर्निंग द्वारे  व्यवस्थापन शास्त्राच्या विद्यार्थ्यांचे अभ्यास,अध्ययन सुरु आहे. आय एम ई डी चे संचालक डॉ सचिन वेर्णेकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. 


प्राध्यापक वर्गाकडून अत्याधुनिक तंत्र ज्ञानाच्या गुगल क्लासरूम,वेबेक्स,झूम,पॉवर सॉफ्ट,इंटर एक्टीव्ह पोर्टल ,यू ट्यूब चॅनेल,रिमोट क्लासरूम  अशा माध्यमातून प्रभावी अध्यापन केले जात आहे.


 नेहमीच्या क्लासरूम ची जागा आता गुगल क्लासरूम,वेबिनारने घेतली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार ई -पीजी पाठशाला,ई -कंटेन्ट,स्वयंप्रभा,नॅशनल डिजिटल लायब्ररी,इ-लायब्ररी असे शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात यश मिळाले आहे. विद्यार्थी टी सी एस ,प्रो -विस्डम,करिअर एज अशा संस्थांद्वारे आयोजित ऑनलाईन सर्टिफिकेशन कोर्स पूर्ण करीत आहेत.


 क्लाउड कम्प्युटिंग,मशीन लर्निंग,सायबर सिक्युरिटी,स्किल डेव्हलपमेंट,एप्टीट्यूड क्लास या विषयांचा त्यात समावेश आहे.  व्यवस्थापन शास्त्राचे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यात आधुनिक माध्यमातून संवाद,ज्ञानाचे आदान प्रदान सुरु आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देऊन समुपदेशनही केले जात आहे. 


प्राध्यापक देखील विद्यापीठ अनुदान आयोग,अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद,लर्निंग हब अशा माध्यमातून अध्यापन तंत्रे अद्ययावत करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या कॅम्पस प्लेसमेंट साठी प्रयत्न सुरु असून लॉक डाऊन संपल्यावर विद्यार्थी संबंधित कंपन्यांमध्ये रुजू होतील,अशी माहिती डॉ सचिन वेर्णेकर यांनी दिली. 


................................................
(


Popular posts
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा*                                        - उपमुख्यमंत्री अजित पवार   * पुणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक
Image