शिवाजीनगर गावठाण युवकांनी एकीचे भान ठेवून रांगा लावून केले रक्तदान

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


*रक्तदान ऐक जीवनदान🩸*


 


*क्तदान केले या मधे प्रामुख्याने पुणे शहर पोलिस दलातील  बांधव, महिला वर्ग तसेच अनेक तरुण मित्र यांनी रक्तदान केले*


 


*लॉक डाऊनच्या नकारात्मक बातम्यांचा कंटाळा आला असल्यास जरा हे पण वाचा*


 


*एका ठिकाणी सरकारने दारूची दुकाने सुरू केली आणि लोकांनी दिवाळी साजरी केली. मोठयाच्या मोठ्या रांगा लावून लोकांनी दारू खरेदी केल्याचे मेसेज इलेक्ट्रॉनिक मीडियावर व्हायरल झाले. होलसेल मध्ये माल खरेदी करावा अशी दारू लोकांनी खरेदी केली... आज काहीसं असंच दृश्य आम्हाला अनुभवायला मिळालं.


 


 *दूसरीकडे मात्र अखिल शिवाजीनगर गावठान शिवमहोस्तव समिति मार्फत शिवशंभु कार्य घडत गेले ते रक्तदान शिबिर मार्फत.*


 


*लॉक डाऊन मध्ये अनेक दिवसांपासून घरात असलेले शिवाजीनगर येथील युवक, महिला तसेच सरकारी कर्मचारी, पोलीस मित्र बांधव, व्यावसायिक मित्र बंधु आज सकाळी सकाळी लवकर उठून वेळे अधिच रांगा लावून उभे होते... निमित्त होते अहिल्याबाई होळकर जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे...*


 


*#राष्ट्रीय #कर्तव्यासाठी #रक्तदान #शिबीराचे...🩸 आयोजन #अखिल #शिवाजीनगर #गावठाण #शिवमहोत्सव #समितीच्यावतीने शिवाजीनगर गावठाण येथील रोकडोबा महाराज मंदिर येथे करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, #कोरोनाच्या #पार्श्वभूमीवर #रक्ताची #महाराष्ट्राला व *#देशाला गरज आहे.*


 


*करोना किंवा इतर कोणत्याही आजारामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या पेशन्टला रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.*


 


*या रक्तदान शिबिरासाठी सर्व कार्यकर्त्यांनी गेला आठवडाभर सोशल मीडियावर मेसेज पाठवून, फोन करून प्रचंड प्रमाणात प्रसिद्धी दिली होती. त्याचप्रमाणे आज सोशल डिस्टनसिंगचे पालन करण्यासाठी देखील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले..*


 


*शिवाजीनगर गावठाणातील अनेक युवक, युवती तसेच महिला वर्ग, पोलिस मित्र बंधु असे एकूण 114 जन मीळून असे रक्तदान केले*


 


*आम्ही हा मेसेज कोणत्याही प्रसिद्धी साठी केले नसुन या द्वारे आपण सर्वानी प्रेरित होऊन समाज कार्य करावे ही सदिच्छा*


 


*आपले शिवशंभु सेवक,*


*अखिल शिवाजीनगर गावठान शिवमहोस्तव समिति पुणे*


 


🩸👍🏻🩸👍🏻🩸👍🏻🩸👍🏻