राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर्स सेल कडून पत्रकार संघ सदस्यांसाठी फेस शिल्ड* 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेस नोट 
 *राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर्स सेल कडून पत्रकार संघ सदस्यांसाठी फेस शिल्ड*


पुणे:
  कोरोना विषाणू साथीच्या संसर्गापासून बचावासाठी उपयुक्त ठरणारे फेस शिल्ड आज(शुक्रवारी दुपारी) राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर्स सेलकडून पुणे श्रमिक पत्रकार संघ सदस्यांसाठी देण्यात आले.राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे अध्यक्ष डॉ.सुनील जगताप,पालिकेतील विरोधी पक्षनेत्या सौ.दीपाली धुमाळ यांच्याहस्ते पुणे श्रमिक पत्रकार संघ अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश भोईटे यांच्याकडे हे फेस शिल्ड सुपूर्द करण्यात आले.यावेळी प्रदीप धुमाळ,डॉ.राजेश पवार,विक्रांत आढाव,डॉ हेमंत तुसे,डॉ.शशिकांत कदम,डॉ. संगीता खेनट,डॉ.नरेंद्र खेनट,डॉ राहुल सूर्यवंशी तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर्स सेलचे प्रसिद्धीप्रमुख दीपक बीडकर उपस्थित होते.
 पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार,खा.सुप्रिया सुळे,खा.वंदना चव्हाण,डॉक्टर सेल प्रदेश अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट तर्फे राज्यात दीड लाख फेसशिल्डचे वितरण आरोग्य व्यवस्थामधील डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांना केले जात आहे.
'कोरोना विषाणूच्या संकट काळामध्ये वैद्यकीय सेवा ही आपली युद्धभूमी समजून धैर्याने सेवा देत आहेत अशा सर्व डॉक्टरांना फेस शिल्ड देण्यात येत आहे.पुण्यात १६ वैद्यकीय संघटनामार्फत फेसशिल्ड चे वितरण करण्यात आले. पत्रकार हे प्रतिकूल परिस्थितीत वार्तांकनाचे कर्तव्य करण्यासाठी कार्यरत असल्याने त्यांनाही हे फेस शिल्ड देण्यात येत आहे'असे डॉ.सुनील जगताप यांनी यावेळी सांगितले.  
------------------------------------------------------------