कोरोना प्रभावग्रस्त वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर                                जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कोरोना प्रभावग्रस्त वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर
                             
 जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे, दि.4: पुणे जिल्हयातील महानगरपालिका क्षेत्राकरिता प्राधिकृत अधिकारी असणारे पुणे व पिंपरी-चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त यांनी दिनांक 3 मे 2020 रोजी  रात्री 12 वाजल्यापासून आदेशात नमूद महापालिका क्षेत्र हे हॉटस्पॉट/ कंन्टेनमेंट झोन म्हणून प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. तसेच कोरोना प्रभावग्रस्त व्यक्तींची वाढती संख्या विचारात घेऊन जिल्हयातील ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 7 तालुके प्रतिबंधित क्षेत्रे जाहिर  केल्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी निर्गमित केले आहेत.
  पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील काही भाग हॉटस्पॉट/ कंन्टेनमेंट झोन म्हणून प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहेत. 
तसेच बारामती तालुका - माळेगाव बुद्रक व लकडेनगर. 
इंदापूर तालुका- भिगवण, तक्रारवाडी व डिक्सळ. 
हवेली तालुका - मौजे जांभुळवाडी, मौजे वाघोली, आव्हाळवाडी, भावडी, केसनंद, नांदेड, खडकवासला, किरकटवाडी, सोनापूर, मालखेड, वरदाडे, जांभूळवाडी व कोळेवाडी या गावाचा रहिवास परिसर, मौजे किरकटवाडी (कोल्हेवाडी), मौजे नऱ्हे, खानापूर, लोणीकंद, उरळी कांचन, पिसोळी, वडाची वाडी, हांडेवाडी या गावाचा रहिवास परिसर, सिध्दीविनायक नगरी, दत्तनगर, परमार कॉम्प्लेक्स, निगडी (पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्र), मांजरी बुद्रुक, कदमवस्ती, लोणी काळभोर, कोंढवे धावडे.
शिरुर तालुका- शिक्रापूर. 
वेल्हा तालुका- मौजे निगडे मोसे, मौजे ओसाडे, वेल्हे बुद्रुक, कोंढवाळे बुद्रुक व कोंढवाळे खुर्द, खोडद, ढाणे, वाघदरा,  ब्राम्हणघर, हिरपोडी. 
भोर तालुका - मौजे नसरापूर, कामथडी, खडकी, उंबरे, केळवडे, नायगाव,  मालेगाव, देगाव, दिडघर, सांगवी बुद्रुक, निधान, विरवाडी, व केतकवळे. 
दौंड तालुका - मौजे दहिटणे, मिरवाडी, नांदूर, खामगाव, गणेशनगर, देवकर मळा, बैलखिळा, व  डुबेवाडी, दौंड शहर व बिगर नगरपालिका क्षेत्र, मौजे गोपाळवाडी, माळवाडी, मसनरवाडी, लिंगाळी, पवार वस्ती, दळवीमळा (सोनवडी), भवानीनगर व  भोंगळेमळा (गिरीम).
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड - खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड  कोरोना बाधित 3 कि.मी. परिसर 
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड -  पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड मोदीखाना कॅम्प  3 कि.मी. परीसर, ताडिवाला रोड, गल्ली नंबर 2, 32, 234 घोरपडी गाव, लक्ष्मीनगर व यशवंतनगर येरवडा. 
देहू कॅन्टोन्मेंट बोर्ड - देहू गाव व देहू रोड  कॅन्टोन्मेंट या गावाचा रहिवासी परिसर
****


Popular posts
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा*                                        - उपमुख्यमंत्री अजित पवार   * पुणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक
Image