नागरिकांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणी घेण्याकरिता मनपाचे वतीने स्वतंत्र नियोजन, -मा,रुबल अगरवाल,

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कृपया प्रसिद्धीकरिता,
०५/०५/२०२०,
नागरिकांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणी घेण्याकरिता मनपाचे वतीने स्वतंत्र नियोजन,
-मा,रुबल अगरवाल,
अतिरिक्त मनपा आयुक्त,(जनरल )
कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भाव प्रतिबंधाकरिता पुणे मनपाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत,
पुणे मनपाने शहराच्या विविध भागात आयसोलेशन सेंटर्स व फ्लू क्लिनिक सुरू केलेले आहेत,
तथापि वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर व जलद नियंत्रणाच्या दृष्टीने शहरातील पाच क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत तपासणी केंद्रे बुधवार दिनांक ०६/०५/२०२० पासून संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या  अंतर्गत असलेल्या मनपा शाळेतून सुरू करण्यात आलेली आहेत,
-येरवडा कळस धानोरी,
-कै, ढोले पाटील रस्ता
-शिवाजीनगर घोले रस्ता,
- भवानी पेठ,
-कसबा विश्रामबागवाडा,
या क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत मनपा शाळेत सकाळी १०,ते सायंकाळी ५,वाजेपर्यंत तपासणी करण्यात येणार आहे,तपासणी वेळी फॉर्म भरण्यात येईल, यामध्ये नागरिकांची माहिती भरण्यात येईल, नाव,पत्ता,दूरध्वनी क्रमांक,इत्यादी,
रुग्णाचा नमुना घेतल्यानंतर नोंद केल्यानंतर नमुना स्वीकार केंद्रावरील प्रमुख याच्या नोंदी ठेवणार आहेत,तसेच सदरची माहिती डॉ,नायडू सांसर्गिक रुग्णालयाकडे पाठविली जाईल,
मनपा शाळेत घेण्यात आलेल्या स्वबचे तपासणी अहवालात चाचणी पॉझिटिव्ह आल्यास सदर रुग्णास पुढील उपचारार्थ रुग्णालयात दाखल करून घेण्यात येईल, व संबंधित रुगणाची माहिती  इ मेलद्वारे डॉ,नायडू सांसर्गिक रुग्णालयास त्याच दिवशी कळविण्यात येईल,