अभिनेत्री स्मिता तांबेने शेअर केल्या तिच्या पहिल्या फोटोशूटच्या आठवणी पहिलं वहिलं फोटोशूट अभिनेत्रींसाठी खासच असतं. पण हे फोटोशूट आपल्या लहानपणचं असेल तर ते जास्त खास असतं. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात अभिनेत्री स्मिता तांबे घरीच असल्याने तिला आपल्या आठवणींची शिदोरी उघडून पाहण्याची संधी मिळाली आहे. जून्या फोटो अल्बममध्ये स्मिताला तिचा लहानपणीचा पहिल्या फोटोशूटचा फोटो मिळाला. जो तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. अभिनेत्री स्मिता तांबे तिच्या पहिल्या फोटोशूटविषयी सांगते, " माझ्या आई बाबांनी फार हौसेने लहानपणी माझं पहिलं वहिलं फोटोशूट केलं होतं. खरं तर त्यांनी माझ्यासाठी खास ड्रेस शिवून घेतला होता. ड्रेस तयार झाल्यानंतर त्यांची खूप इच्छा होती की माझं फोटोशूट स्टुडिओतच करायचं. पाठीमागे काश्मीरचं बॅकग्राऊंड होतं. मला लहानपणी वाटायचं आपण खरंच काश्मीरला गेलो होतो. पण तो फोटो स्टुडिओत काढला होता. तो फोटो माझा आवडता फोटो आहे." पुढे ती तिच्या आई-वडिलांविषयी सांगते, "आपल्या आयुष्यात अनेक चढ उतार येतात. त्याक्षणी आपले आई-वडीलचं आपल्या सोबत असतात. ते आपल्याला सांभाळतात. ह्या क्वारंटाईनमध्ये आपल्याकडे फार वेळं आहे तर हा वेळ आपण स्वत:साठी देऊया आणि आपण ज्यांच्यावर नितांत प्रेम करतो. त्यांची आठवणं काढूयात."

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


अभिनेत्री स्मिता तांबेने शेअर केल्या तिच्या पहिल्या फोटोशूटच्या आठवणी


 


पहिलं वहिलं फोटोशूट अभिनेत्रींसाठी खासच असतं. पण हे फोटोशूट आपल्या लहानपणचं असेल तर ते जास्त खास असतं. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात अभिनेत्री स्मिता तांबे घरीच असल्याने तिला आपल्या आठवणींची शिदोरी उघडून पाहण्याची संधी मिळाली आहे. जून्या फोटो अल्बममध्ये स्मिताला तिचा लहानपणीचा पहिल्या फोटोशूटचा फोटो मिळाला. जो तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.


अभिनेत्री स्मिता तांबे तिच्या पहिल्या फोटोशूटविषयी सांगते, " माझ्या आई बाबांनी फार हौसेने लहानपणी माझं पहिलं वहिलं फोटोशूट केलं होतं. खरं तर त्यांनी माझ्यासाठी खास ड्रेस शिवून घेतला होता. ड्रेस तयार झाल्यानंतर त्यांची खूप इच्छा होती की माझं फोटोशूट स्टुडिओतच करायचं. पाठीमागे काश्मीरचं बॅकग्राऊंड होतं. मला लहानपणी वाटायचं आपण खरंच काश्मीरला गेलो होतो. पण तो फोटो स्टुडिओत काढला होता. तो फोटो माझा आवडता फोटो आहे."


पुढे ती तिच्या आई-वडिलांविषयी सांगते, "आपल्या आयुष्यात अनेक चढ उतार येतात. त्याक्षणी आपले आई-वडीलचं आपल्या सोबत असतात. ते आपल्याला सांभाळतात. ह्या क्वारंटाईनमध्ये आपल्याकडे फार वेळं आहे तर हा वेळ आपण स्वत:साठी देऊया आणि आपण ज्यांच्यावर नितांत प्रेम करतो. त्यांची आठवणं काढूयात."


Popular posts
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी झेंडा फडकावण्या मध्ये फरक काय
Image
सावित्रीमाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील क्रांतिकारक योगदान:-
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. श्री. *बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त* शिवसेना-युवासेना  वर्षी तसेच महाविकासाघाडी आनि वर्षी ग्रामस्थ यांच्यातर्फे बाळासाहेब ठाकरे ना अभिवादन' करण्यात आले
Image