अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या सर्वंकष प्रोत्साहनपर योजनेच्या आशेने सोन्याच्या किंमतीत वाढ ~ कच्च्या तेलाच्या किंमतीतही वाढ; चांदीच्या किंमतीत किंचितशी घट ~

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या सर्वंकष प्रोत्साहनपर योजनेच्या आशेने सोन्याच्या किंमतीत वाढ


~ कच्च्या तेलाच्या किंमतीतही वाढ; चांदीच्या किंमतीत किंचितशी घट ~


मुंबई, १३ मे २०२०: मंगळवारी स्पॉट गोल्डच्या किंमती ०.३६ डॉलर वेगासह १७०२.१ डॉलर प्रति औंसांवर बंद झाल्या. कारण घसरणा-या डॉलरने पिवळ्या धातूच्या किंमतीला आधार दिला. अमेरिकी फेडरलने मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आणि गोठलेल्या आर्थिक विकासाच्या परिस्थितून मार्ग काढण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलली आहेत. ईटीएफचे शेअर्स खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली, जे आपल्या सेकंडरी मार्केट कॉर्पोरेट क्रेडिट फॅसिलिटीच्या माध्यमातून ब्रँडमध्ये गुंतवणूक करतात. अमेरिका आणि चीनसह अनेक देशांनी केलेल्या धोरणात्मक प्रोत्साहनपर उपाय हे सोन्याच्या किंमती वाढण्यामागील कारण असू शकल्याचे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे नॉन अॅग्री कमोडिटीज व करन्सीजचे मुख्य विश्लेषक श्री प्रथमेश माल्या यांनी व्यक्त केले.


मंगळवारी स्पॉट सिल्व्हरचे दर ०.९० अंशांच्या घसरणीसह १५.४ डॉलर प्रति औसांवर बंद झाले. एमसीएक्सवर किंमत ०.४१ टक्के कमी होऊन ४३,०५४ रुपये प्रतिकिलो‌वर बंद झाली.


सौदी अरबने उत्पादन आणि आउटपूटमध्ये आक्रमक कपातीची घोषणा केल्यानंतर मंगळवारी डब्ल्यूटीआय क्रूड तेलाच्या किंमती ६.७ टक्क्यांनी वाढून २५.८ डॉलर प्रति बॅरलवर आल्या. त्यांनी कच्च्या तेलाची मागणी वाढवण्यासाठी उत्पादनात दररोज १ मिलियन बॅरलची वाढ करण्यावर सहमती दर्शवली. हा फॅक्टर ओपेकच्या निर्णयासह जोडून पाहायला हवा. यानुसार मे आणि जून २०२० मध्ये उत्पादन कमी करत कपात दररोज ९.७ दशलक्ष यूनिटपर्यंत करायची होती. कोरोना व्हायरसची नवी लाट आणि हवाई तसेच रस्ते वाहतुकीवरील निर्बंधांमुळे कच्च्या तेलाच्या लाभांना अधिक मर्यादा पडल्या असल्याचे श्री माल्या यांनी सांगितले.


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
मा श्री. विनय सुदामपंत शेलुर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांना कोविड १९ महायोद्धा 2020 (KOVID 19 WARRIORS 2020 ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Image
मा.श्री.शादाब मुलाणी युवासेना पुणे यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन