माथेरानमध्ये संचारबंदी   काळात हॉटेल कर्मचार्याची  घुसखोरी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 






माथेरानमध्ये संचारबंदी   काळात हॉटेल कर्मचार्याची  घुसखोरी

 

कर्जत दि,3 गणेश पवार

 

  सध्या कोविड १९ च्या प्रार्दुरभावामुळे संचारबंदीचे काटेकोर पालन करत येथील प्रशासनाने माथेरानच्या सिमा बंद केल्या आहेत. येथे  अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीवर्ग तसेच जिवनावश्यक वस्तुचे माल वाहतुकदारा शिवाय येथील प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाका येथुन कोणालाही आत कींवा बाहेर प्रवेश दिला जात नाही.मात्र विष्णु खेरुर नावाची ही व्यक्ती आर. सी. क्लब या कंपनी द्वारे माथेरानमधील  एका खाजगी हॉटेल मध्ये काम करत असुन २४ मार्च रोजी ही व्यक्ती कल्याण येथे गेली होती.मात्र खेरुर हा आज दि. २ मे रोजी  माथेरान प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर कोणाचीही परवानगी न घेताच घुसखोरी करत गावामध्ये येऊन आपल्या सहकार्या सोबत भाडेतत्वावर असलेल्या खोली मध्ये लपुन बसला होता.

 

याची कानकुन,माथेरान पोलीसांना लागताच या व्यक्तीला माथेरान पोलीसांनी ताब्यात घेतले असुन आरोग्य तपासणी करीता बि.जे.हॉस्पिटल येथे घेऊन गेले आहेत.मात्र प्रश्न असा आहे की ठाणे जिल्हात सध्या कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता हा जिल्हा रेड झोन म्हणुन सरकारने घोषीत केला आहे. तरी देखील विष्णु खेरुर या व्यक्तीने कल्याण ते माथेरान हा प्रवास बाय रोड आपल्या खाजगी वाहनाने कोणत्या आधारावर केला ?  व या व्यक्तीला संचारबंदी असताना जिल्हा बदली चेक पोष्टवर कोणतीही परवानगी नसताना अडवले कसे नाही  ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.परंतु माथेरान मध्ये अशा प्रकारे घुसखोरी करुन येथील लोकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आणि कोविड १९ विषाणुचा प्रादुर्भाव प्रतिबंधनात्मक कायद्याचा भंग केल्या प्रकरणी त्याची माथेरान पोलीसांकडुन चौकशी होत असुन या व्यक्तीवर कोणती कारवाई केली जाते यावर सर्व माथेरानकरांचे लक्ष लागले आहे.