जागतिक परिचारीका दिनानिमित्त परिचारीका पुजा निकम यांना “फ्रेन्स नाईटिंगेल्स पुरस्कार प्रदान"*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल। *


 


जागतिक परिचारीका दिनानिमित्त परिचारीका पुजा निकम यांना “फ्रेन्स नाईटिंगेल्स पुरस्कार प्रदान"*


 


*पुणे :-* जागतिक परिचारीका दिनानिमित्त परिचारीका पुजा निकम यांना पुणे शहर रूग्ण सेवा समितीच्या वतीने देण्यात येणारा “फ्लरेन्स नाईटिंगेल्स पुरस्कारप्रसिध्द उदयोगती श्री कृष्णकुमार गोयल यांचे हस्ते प्रदाण करण्यात आला.


१८५४ साली झालेल्या किमियन युध्दातील जखमी सैनिकांना मलमपटटी करीत हिंडणारी आदय परिचारीका (नर्स) "फ्लरेन्स नाइटिंगेल्स' यांचा हा जन्मदिवस. फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांना आधूनिक शुश्रुषा शास्त्राची संस्थापिका समजले जाते. स्वत:चे दुःख विसरून रूग्णंच्या वेदनेवर मायेची फुंकर घालणाच्या या परिचरीका असतात...


याप्रसंगी बोलताना श्री.कृष्णकुमार गोयल म्हणाले कोरोनामुळे उद्भवलेल्या या भीषण परिस्थितीत डॉक्टर,नर्स,वॉर्डबॉय व इतर आरोग्य विभागातील कर्मचारी आपला जीव धेक्यात घालून आपल्या जीवाची पर्वा न करता रूग्णांची सेवा करीत आहे. अशा सर्व कोरोना योध्दांबदद्ल मला सार्थ अभिमान वाटतो व त्यांचे हे ऋण समाज कधीही विसरू शकत नाही.