स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे भाड्यासाठी पुणे जिल्ह्याला ८ कोटी- जिल्हाधिकारी नवल  किशोर राम

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे भाड्यासाठी पुणे जिल्ह्याला ८ कोटी- जिल्हाधिकारी नवल  किशोर राम
 पुणे, दि. 13- 
लॉकडाऊन मधील कालावधीत परराज्यातील असणारे स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी व परराज्यात असणारे राज्यातील स्थलांतरित मजुरांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी श्रमिक रेल्वे तिकीटाचे शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून भरण्यात येणार असून त्यासाठी पुणे जिल्ह्याला ८ कोटी रुपये मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
   जिल्हाधिकारी राम म्हणाले, लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या परराज्यातील स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी व परराज्यात असणारे राज्यातील स्थलांतरित मजूर यांना राज्यामध्ये परत येण्यासाठी काही अटी व शर्तीवर प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच यासाठी रेल्वे मंत्रालयाने श्रमिक रेल्वे देखील सुरू केलेल्या आहेत.
 राज्यात अडकलेले स्थलांतरित मजुर परराज्यात जाण्यासाठी व परराज्यात अडकलेले राज्यातील स्थलांतरित मजूर राज्यात परत येण्यासाठी जे स्थलांतरित मजूर रेल्वे प्रवासाचे भाडे भरू शकत नाहीत, त्यांच्या रेल्वे प्रवास भाडयाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून भरण्याचा निर्णय शासनाने घेतला त्यानुसार पुणे जिल्ह्यासाठी ८ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. राज्यात अडकलेले जे स्थलांतरित मजूर त्यांच्या त्यांच्या राज्यात जाण्यास इच्छूक आहेत अशा मजुरांना त्यांच्या राज्यात पोहचविण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या बाबतीत संबंधित पोलीस उपायुक्त व इतर क्षेत्रासाठी जिल्हाधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी हे समन्वय अधिकारी राहतील, असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी सांगितले.


समन्वय अधिकारी  त्यांच्या क्षेत्रामध्ये अडकलेल्या व मुळ गावी जाण्यास इच्छुक असलेल्या स्थलांतरित मजुरांच्या नावाची यादी तयार करतील. यापैकी जे मजूर रेल्वे प्रवासाचे भाडे भरू शकत नाहीत अशा मजुरांच्या प्रवासाच्या भाडयाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून जिल्हाधिकारी यांचे कडे प्राप्त झालेल्या रक्कमेमधून  रेल्वेकडे भरली जाईल.
 याचपध्दतीने परराज्यात अडकलेले महाराष्ट्रातील स्थलांतरित मजूर राज्यामध्ये येण्यास इच्छूक असतील व रेल्वे प्रवासाचे भाडे भरण्याची त्यांची क्षमता नसेल अशा स्थलांतरित मजूरांना राज्यात परत आणण्यासाठी पराज्यातील संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडून प्राप्त झालेली यादी विचारात घेवून अशा मजुरांच्या रेल्वे प्रवासाच्या भाडयाची रक्कम जिल्हाधिकारी रेल्वेकडे भरतील.


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
मा श्री. विनय सुदामपंत शेलुर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांना कोविड १९ महायोद्धा 2020 (KOVID 19 WARRIORS 2020 ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Image
मा.श्री.शादाब मुलाणी युवासेना पुणे यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन