देश हितासाठी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून राज्यभरात रक्तदान शिबीर - सौरभ खेडेकर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


**


 


पुणे - राष्ट्रीय कर्तव्य म्हणून देशहितासाठी संभाजी ब्रिगेड अडचणीच्या व संकटाच्या काळात नेहमी एक पाऊल पुढे असते ज्यावेळी देशामध्ये नैसर्गिक संकटे आली त्यावेळी गुजरात भुकंप, कोल्हापूर महापुर यावेळी संभाजी ब्रिगेड नेहमी मदत करत आलेली आहे. गुजरात भूकंपाच्या वेळी सन 2000 मध्ये संभाजी ब्रिगेडने सुमारे '73 लाख' रुपयांची आर्थिक मदत गुजरात सरकार'ला केली होती. आज कोरोना महामारी च्या संकटामुळे संपूर्ण देश संकटात आहे. देशामध्ये रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे आपल्या देशहितासाठी अडचणीच्या काळात राष्ट्रीय कर्तव्य म्हणून महाराष्ट्रात सात दिवसाचा देशहितासाठी *'रक्तदान शिबीर सप्ताह'* आयोजित करण्यात आलेला आहे. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पुण्यामध्ये (हडपसर विभागात) आज करण्यात आले. आज पासून संपूर्ण पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात रक्तदान शिबिर होणार आहेत... असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव मा. सौरभ खेडेकर यांनी व्यक्त केले.


 


राजमाता अहिल्या राणी होळकर यांच्या २९५ व्या जयंती निमित्त व ३४६ वा शिवराज्याभिषेक दिना निमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने 31 मे ते 6 जून रक्तदान शिबिर सप्ताह पुणे शहर जिल्हा व महाराष्ट्र मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे याचे उद्घाटन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव माननीय सौरभ खेडेकर यांच्या हस्ते आज करण्यात आले.


 


कोरोना महामारी च्या संकटामध्ये पुण्यात हजारो विद्यार्थी व कामगार लाॕक डाऊन मुळे अडचणीत होते. त्यांना एक वेळ जेवणाची सुद्धा अडचण असायची. मार्च - एप्रिल महिन्याच्या काळात संभाजी ब्रिगेड पुणे शहराच्या वतीने आपण शेकडो मुलांना मोफत जेवणाचे घरपोच डबे पुरवले. मराठवाडा, विदर्भ व राज्याबाहेरील शिक्षणासाठी पुण्यात आलेली या विद्यार्थ्यांना संभाजी ब्रिगेड ने दोन वेळचं पोटभर जेवण देण्याचं प्रामाणिक कर्तव्य केले, कारण माणसं जगली पाहिजेत आणि माणसांना पोटभर अन्न मिळाले पाहिजे. तसेच ज्या लोकांची लॉकडाऊन काळात घरात चूल पेटवलेली नव्हती अशा 80 - 90 कुटुंबांना किराणा उपलब्ध करून देण्याचे काम संभाजी ब्रिगेडने केले. हेच राष्ट्रीय कर्तव्य असल्यामुळे आम्ही लोकांसाठी लढत व काम करत आहोत. 


 


यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, जिल्हा सचिव महादेव मातेरे, भोर तालुकाध्यक्ष गणेश चऱ्हाटे, हडपसर मतदार संघाचे कार्याध्यक्ष निलेश काळे, संभाजी ब्रिगेडच्या नेत्या रोहिणी भोसले, विवेक तुपे, रमजान शेख, संजय चव्हाण, नवनाथ गुंजाळ, भाऊसाहेब वारे, सचिन करळे, आकाश ठोसर, धनंजय शेवाळे, अनिल खांडेकर, आण्णासाहेब शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या रक्तदान शिबिर उद्घाटनास यावेळी उपस्थित होते. लॉक डाऊन काळात सुद्धा (३४) रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवला.


 


आज रक्तदान शिबिराचे हडपसर विभागाचे आयोजन संभाजी ब्रिगेड चे पुणे शहराचे कार्याध्यक्ष संदीप लहाने पाटील यांनी केले. सर्व व रक्तदात्यांचे आभार निलेश काळे यांनी मानले.


 


*संभाजी ब्रिगेड, पुणे जिल्हा...🚩*