लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी स्टार इंडिया समुहाने उचललं अनोखं पाऊल घरात सुरक्षित राहूनच चालू द्या हे एन्टरटेन्मेण्ट आणि आपल्या टीव्ही पॅकेजचे करा ऑनलाईन पेमेण्ट

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी स्टार इंडिया समुहाने उचललं अनोखं पाऊल


घरात सुरक्षित राहूनच चालू द्या हे एन्टरटेन्मेण्ट आणि आपल्या टीव्ही पॅकेजचे करा ऑनलाईन पेमेण्ट


 


प्रेक्षकांच्या मनोरंजनाची पुरेपुर काळजी घेणाऱ्या स्टार इंडिया समुहाने आता मनोरंजनासोबतच प्रेक्षकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. महिन्याला जवळपास ७० कोटी प्रेक्षकांच्या घरात पोहोचणाऱ्या स्टार इंडिया समुहाने घरात सुरक्षित राहूनच चालू द्या हे एन्टरटेन्मेण्ट आणि आपल्या टीव्ही पॅकेजचे करा ऑनलाईन पेमेण्ट हे कॅम्पेन सुरु केलं आहे. ज्याद्वारे तुम्हाला घराबाहेर पडण्याची गरज नाही,  तर घरबसल्या तुम्हाला तुमच्या टीव्ही पॅकेजचं ऑनलाईन पेमेण्ट करता येणार आहे.


या कॅम्पेनद्वारे घरी राहा सुरक्षित राहा या गोष्टीवर भर देण्याचा प्रयत्न केला जातोय. स्टार इंडिया समुहाचे अध्यक्ष आणि वितरण आणि आंतरराष्ट्रीय व्यापार प्रमुख गुरजीव सिंग कपूर म्हणाले, मी केबल आणि डीटीएच पार्टनर्सचं मनापासून कौतुक करतो. सध्याच्या कठीण प्रसंगातही प्रेक्षकांच्या मनोरंजनात कोणताही खंड पडू नये यासाठी ते झोकून देऊन काम करत आहेत. त्यांच्या या कामगिरीली आमचा सलाम.


खास लोकाग्रहास्तव स्टार इंडिया समुहाने काही खास मालिकांचं पुन:प्रक्षेपण सुरु केलं. यामध्ये स्टार प्रवाहवर सध्या सुरु असलेल्या राजा शिवछत्रपती आणि सुपरहिट बबन सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर, स्टार प्लसवरील महाभारत, हॉटस्टार स्पेशल प्रेजेण्ट्स हॉस्टेजेस ही वेबसीरिज, नवा कॉमेडी शो महाराज की जय हो यांचा समावेश आहे. स्टार भारतवरही डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक महामानवकी महानगाथा हा शो हिंदीमध्ये सुरु करण्यात आलाय.


स्टार गोल्डवरही नवनव्या सिनेमांची पर्वणी सध्या सुरु आहे. ज्यामध्ये हाऊसफुल ४, बाला, दरबार, छपाक अश्या नव्या सिनेमांचा समावेश आहे. स्टार मुव्हीजवरही बच्चेकंपनीच्या मनोरंजनासाठी वेगवेगळ्या सिनेमांचा नजराणा सुरु आहे. छोट्या दोस्तांसाठी डिस्ने आणि हंगामा वाहिनेनीही कंबर कसली आहे. लहानग्यांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांवर भर दिला जातोय.


खेळाची आवड असणाऱ्या प्रेक्षकांसाठी स्टार स्पोर्टस समुहाने बेस्ट ऑफ आयपीएल सारखा कार्यक्रम सुरु केला आहे. यासोबतच आपल्या लाडक्या खेळाडुंशी घरबसल्या गप्पा मारण्याची संधीही स्टार स्पोर्ट्स समुहाकडून देण्यात येतेय.  


तेव्हा मनोरंजनाने परिपूर्ण अश्या या स्टार इंडिया समुहाने प्रेक्षकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उचललेलं पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. तेव्हा घरात सुरक्षित राहूनच चालू द्या हे एन्टरटेन्मेण्ट आणि आपल्या टीव्ही पॅकेजचे करा ऑनलाईन पेमेण्ट.