हाँगकाँगमधील आंदोलनाचे सोन्याच्या किंमतीवर पडसाद

* पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


  


मुंबई, ३० मे २०२०: हाँगकाँगमधील आंदोलन तीव्र झाल्याने गुरुवारी सोन्याच्या किंमती ०.५६ टक्क्यांनी वाढल्या. या भागात सुरक्षाविषयक कायदे कठोरपणे राबवण्याची चीनची योजना आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हाँगकाँगच्या जनतेला प्रतिकार करण्याची व एकजूट दाखवण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेतील बेरोजगारीही हळू हळू वाढत आहे. यामुळे महामारीनंतरचा सुधारणेचा काळ अपेक्षेपेक्षा मोठा असू शकतो हे दिसून येते. आर्थिक अनिश्चिततेमुळे बाजाराच्या भावनांवर परिणाम झाला असून यामुळे यलो मेटलच्या किंमती वाढल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे मुख्य विश्लेषक श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले 


 


स्पॉट सिल्वर किंमती ०.६९ टक्क्यांनी वाढून त्या १७.४ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या. एमसीएक्सवरील किंमतीही ०.३५ टक्क्यांनी वाढून ४८,५५८ रुपये प्रति किलोनी वाढल्या.


 


वाढती मागणी आणि शुद्धीकरण प्रक्रियांमध्ये वाढ झाल्यामुळे डब्ल्यूटीआय क्रूडच्या किंमती २.७ टक्क्यांनी वाढून ३३.७ डॉलर प्रति बॅरलवर बंद झाल्या. यामुळे जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील तणावाची स्थिती झाकोळण्याचे काम झाले. अमेरिकेतील एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशन (ईआयए) च्या अहवालानुसार, यू.एस. क्रूड यादीतील अभूतपूर्व वाढीमुळे कच्च्या तेलाचा नफा मर्यादित झाला.


 


ओपेक आणि सौदी अरेबियाने उत्पादन कपातीचा घेतलेला निर्णय कायम ठेवायचा की नाही याावर बैठकीत चर्चा होणारर आहे. तथापि, आणखी उत्पादन कपातीवर रशियाने नकार दिल्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतींवर दबाव आला. अजूनही जगातील अनेक देशांमध्ये रस्ते आणि हवाई वाहतुकीवर निर्बंध आहेत. त्यामुळे तेलाच्या किंमतीत आणखी वाढ होण्यावर मर्यादा आहेत.


Popular posts
शिवपुत्र राजाराम महाराज 🚩"  शिवाजी महाराजांच्या  तृतीय पत्नी राणी सोयराबाई यांच्या पोटी 24 फेब्रुवारी 16 70 रोजी राजाराम महाराजांचा जन्म झाला .
Image
ज्ञानदाइन्स्टिट्यूट ऑफ फ्लो पायपिंग टेक्नॉलॉजी द्वारे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध
२७ फेंबुवारी मराठी भाषा दिन* जाणतो मराठी .......मानतो मराठी ; जागतिक मराठी दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image
झीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*