*मा. महापौर, मा. अध्यक्ष, स्थायी समिती, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव व प्रमुख अधिकाऱ्यांची स्मार्ट सिटी कमांड सेंटरला भेट*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*मा. महापौर, मा. अध्यक्ष, स्थायी समिती, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव व प्रमुख अधिकाऱ्यांची स्मार्ट सिटी कमांड सेंटरला भेट*


करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्यासह महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे स्मार्ट सिटी कमांड सेंटर येथील करोना वॉर रूमला भेट दिली.


यावेळी मा. अध्यक्ष, स्थायी समिती हेमंत रासने, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, साखर आयुक्त सौरभ राव, सहकार आयुक्त अनिल कवडे, अतिरिक्त आयुक्त (जनरल) व पुणे स्मार्ट सिटीच्या सीईओ रुबल अग्रवाल पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्वेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त (विशेष) शंतनू गोयल उपस्थित होते. 


श्रीमती अग्रवाल यांनी पुणे शहरातील करोना संबंधी सद्यस्थितीचे सविस्तर माहितीसह सादरीकरण केले. त्या अनुषंगाने महापौर, आयुक्त यांसह प्रमुख अधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली. यावेळी आरोग्य विभागप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, डॉ. संजीव वावरे, आयटी विभागप्रमुख राहुल जगताप, उपायुक्त माधव जगताप व इतर अधिकारी उपस्थित होते.


पुणे शहरातील वाढणाऱ्या करोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर करोना प्रतिबंधाच्या दृष्टीने सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.


Popular posts
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image