गुजरात व कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रात लॉकडाऊन काळातील वीज बिल स्थिर आकार रद्द करावा - अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय सदस्य सूर्यकांत पाठक यांची मागणी 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


गुजरात व कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रात लॉकडाऊन काळातील वीज बिल स्थिर आकार रद्द करावा -

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय सदस्य सूर्यकांत पाठक यांची मागणी

 

पुणे : वीज ग्राहकाने वीज जोडणी घेतल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या वीज बिलात त्याच्या जोडभारानुसार आयोगाने मंजूर केलेल्या दराने किमान काही रक्कम स्थिर आकार म्हणून आकारली जाते. मात्र, करोना प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने देशभरातील उद्योग गेल्या दीड महिन्यापासून बंद आहेत. हा बंद शासन आदेशाने करावा लागत असल्याने या कालावधीत स्थिर आकार लावण्यात येऊ नये, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय सदस्य सूर्यकांत पाठक यांनी केली आहे. गुजरात व कर्नाटक शासनाने त्यांच्या राज्यातील व्यापारी व औद्योगिक वीज ग्राहकांच्या लॉकडाऊन कालावधीतील स्थिर आकार रद््द (माफ) केला आहे. असा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने करावा, अशी मागणी गेल्या महिनाभरापासून सर्व औद्योगिक संघटनांनी तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने वारंवार राज्य शासनाकडे केली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उर्जामंत्री, सर्व पालकमंत्री यांना अनेक वेळा ई-मेल, ट्विटर यावर निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. 

सूर्यकांत पाठक म्हणाले, एखाद्या महिन्यात वीज ग्राहकांचा वीज वापर शून्य असेल, तरीही हा स्थिर आकार भरणे अनिवार्य असते. वीज कंपनीने उभ्या केलेल्या पायाभूत सुविधा व विशिष्ट जोडभार त्या ग्राहकासाठी आरक्षित होत असल्याने ही आकारणी योग्य आहे. व्यापार व औद्योगिक वीज ग्राहकाचा जोडभार खूप मोठा असल्याने त्यांच्या बीलातील स्थिर आकाराच्या रकमा देखील मोठया असतात. मात्र, लॉकडाऊनच्या काळात हा आकार माफ करणे गरजेचे आहे. 

ते पुढे म्हणाले, उर्जामंत्री नितीन राऊत यांनी तीन महिन्यांचा स्थिर आकार स्थगित करत असल्याचे जाहीर केले आहे. पण स्थगित केलेला आकार तीन महिन्यांनंतर भरावा लागेल. हा भुर्दंड उद्योग क्षेत्रास पेलणे शक्य नसल्याने हा आकार रद््द करावा. तसेच व्यापारी आस्थापने बंद असल्याने वीज वापरही बंद आहेत, त्यामुळे अव्हरेज रिडिंगही त्या महिन्यांसाठी घेण्यात येऊ नये, अशी मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

तरी वरील बातमीस आपल्या सुप्रसिद्ध दैनिक/ वृत्तवाहिनीवर प्रसिद्धी द्यावी, ही नम्र विनंती.
                                                                                   
                                    सूर्यकांत पाठकPopular posts
तरुणांनी राज्यशासन व केंद्राच्या योजनेचा लाभ घेवून उद्योजक बनावे – पी.टी काळे
Image
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी झेंडा फडकावण्या मध्ये फरक काय
Image
साहेब मी एक  साधा  पत्रकार आहे..* कर्जत माथेरान नेरळ   :  गणेश पवार दै.शिवतेज✍️
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image